Prithvi Shaw : पृथ्‍वी शॉला दणका, आयपीएल आचारसंहिता भंग केल्‍याने दंड | पुढारी

Prithvi Shaw : पृथ्‍वी शॉला दणका, आयपीएल आचारसंहिता भंग केल्‍याने दंड

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍ली कॅपिटल्‍सचा सलामीवीर पृथ्‍वी शॉ ( Prithvi Shaw ) याच्‍यावर दंडाची कारवाई करण्‍यात आली आहे. आयपीएल आचारसंहिता भंग केल्‍याने त्‍याला सामन्‍यातील मानधनापैकी २५ टक्‍के रक्‍कम दंड म्‍हणून भरावी लागणार आहे. शॉ याने आयपीएल आचारसंहितामधील नियम २.२ नुसार झालेली चूक मान्‍य केली आहे.

विरोधी संघातील खेळाडू किंवा पंच यांना इशारा करणे हे आयपीएल आचारसंहितेमधील नियमाचे उल्‍लंघन होते. अशा प्रकरणारची कृती ही पहिल्‍या टप्‍प्‍यातील चूक मानली जाते. शॉ याच्‍याविरोधात अशा चुकीमुळे कारवाई करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

Prithvi Shaw: कोणत्‍या कारणासाठी दंड हे स्‍पष्‍ट नाही

रविवारी ( दि. १) दिल्‍ली कॅपिटल्‍स आणि लखनौ सुपर जायंटस संघ आमने-सामने होते . रोमहर्षक सामन्‍यात दिल्‍लीने ६ धावांनी सामना जिंकत प्‍लेऑफमधील आपले स्‍थान अधिक भक्‍कम केले. या सामन्‍यात सलामीवीर पृथ्‍वी शॉ अपयशी ठरला. सलग दुसर्‍यांदा तो झटपट बाद झाला. या सामन्‍यवेळी आयपीएल आचारसंहितामधील नियमाचा भंग झाल्‍याची कबुली त्‍याने दिली आहे. मात्र ही चूक नेमकी कोणती हे मात्र अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

Back to top button