

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर शुभमन गिलची (shubman gill) सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. गिल यावेळी त्याच्या खेळामुळे नाही तर त्याने केलेल्या खास मागणीमुळे चर्चेत आहे. खरं तर, शुबमन गिल या युवा क्रिकेटरने सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे.
शुबमनने (shubman gill) आपल्या ट्विटमध्ये एलॉन मस्क यांना फूड डिलिव्हरी स्टार्टअप 'स्विगी' (swiggy) खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. नुकतेच एलॉन मस्क (Elon musk) यांनी नुकतेच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Tweet) 44 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतले आहे. याच कारणामुळे ते सध्या जोरदार चर्चेत आहेत. पण गिलनेही मस्क यांना उद्देशून एक ट्विट केले असून सोशल मीडियावर त्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
शुभमनने ट्विटमध्ये म्हटलंय की, 'एलॉन मस्क, कृपया स्विगी खरेदी करा. जेणेकरून ती वेळेवर पोहोचू शकेल.' गिलचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. तर अनेकांकडून तो ट्रोलही होत आहे.
इतकेच नाही तर गिलच्या ट्विटनंतर लगेचच स्विगीनेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. स्विगीने म्हटंय की, 'हाय शुभमन, ट्विटर किंवा ट्विटर नाही, आम्हाला फक्त तुमच्या ऑर्डरनुसार सर्वकाही परिपूर्ण हवे आहे (जर तुम्ही हो ऑर्डर केली असेल). तुमच्या तपशीलांसह DM मध्ये आमच्याशी संपर्क साधा, आम्ही जलद कार्य करू. यानंतर स्विगीने आणखी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांना शुभमनचा संदेश मिळाल्याचे लिहिले आहे. लवकरच काम होईल.