मुंबई इंडियन्सला धक्का! ‘हा’ वेगवान गोलंदाज IPL मधून बाहेर! | पुढारी

मुंबई इंडियन्सला धक्का! ‘हा’ वेगवान गोलंदाज IPL मधून बाहेर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2022 साठी मुंबई इंडियन्स (MI) संघात समाविष्ट केलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खान (arshad khan) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अर्शदच्या जागी कुमार कार्तिकेय सिंहची (kumar kartikeya singh) निवड करण्यात आली असून तो आगामी सामन्यांमध्ये मुंबई संघात सामील होईल.

मध्य प्रदेशच्या अर्शद खानला (arshad khan) आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना विकत घेतले पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि तो बाहेर पडला.

अर्शदच्या जागी आलेला कार्तिकेय सिंह हा डावखुरा फिरकीपटू आहे आणि मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेटही खेळतो. मुंबई इंडियन्सने या खेळाडूचा 20 लाखांच्या रकमेत समावेश केला आहे.

कुमार कार्तिकेय सिंहने (kumar kartikeya singh) आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी, 19 लिस्ट ए आणि 8 टी-20 सामने खेळले असून, त्याने यात अनुक्रमे 35, 18 आणि 9 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक

पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अत्यंत खराब गेला आहे. हिटमॅन रोहित ब्रिगेडला सलग आठ सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. अशा स्थितीत आता उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करताना विश्वासार्हता वाचविण्याचे आव्हान संघासमोर असेल. संघाचे दोन प्रमुख खेळाडू इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी फलंदाजीत चमक न दाखवल्याने त्यांना खराब परफॉर्मन्सला तोंड द्यावे लागत आहे. आगामी सामन्यांमध्ये त्यांच्या कामगिरीत सुधारणा न झाल्यास संघाला विजयाची नोंद करणे फार कठीण जाईल, असे अनेकांचे म्हणणे आहे.

मुंबई संघातील एकमेव तिलक वर्मा यांची कामगिरी कौतुकास पात्र आहे, बाकीचे खेळाडू त्यांच्या प्रतिमेनुसार कामगिरी करू शकत नाहीत. तिलकनंतर डेवाल्ड ब्रेविस आणि सूर्यकुमार यादव यांनीही चांगली कामगिरी केली आहे, पण त्यांच्याशिवाय फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, इशान किशन ते गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी कोणीही संघाला सामना जिंकून देणारी कामगिरी करू शकलेले नाही.

मुंबईचा संघ असा :

रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अनमोलप्रीत सिंग, कुमार कार्तिकेय सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, बेसिल थम्पी, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टाइमल मिल्स, अर्जुन तेंडुलकर, डॅनियल सॅम्स, डेव्हॉल्ड ब्रेविस, हृतिक शोकिन, संजय यादव, टीम डेव्हिड, इशान किशन, फॅबियन अॅलन, आर्यन जुयाल.

Back to top button