IPL 2022 : नवे आहेत, पण छावे आहेत! 

IPL 2022 : नवे आहेत, पण छावे आहेत! 
Published on
Updated on

मुंबई ; सुनील सकपाळ : आयपीएलमध्ये युवा क्रिकेटपटू केंद्रस्थानी असतात. 15वा हंगामही याला अपवाद नाही. यंदा (IPL 2022) देशांतर्गत क्रिकेट खेळणारा जम्मू आणि काश्मीरचा मध्यमगती गोलंदाज उम्रान मलिक आणि मुंबईचा फलंदाज एन. तिलक वर्मा यांचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल.

सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना उम्रानने 8 सामन्यांत 15 विकेट घेत सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांमध्ये संयुक्तरित्या दुसरे स्थान मिळवताना हैदराबादच्या संघाची सांघिक कामगिरी उंचावण्यात उम्रानने मोलाचे योगदान दिले आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जविरुद्ध त्याने अप्रतिम गोलंदाजी केली. 27 तारखेला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्सना टायटन्सकडून 5 विकेटनी मात खावी लागली तरी प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वच्या सर्व 5 विकेट त्याने घेतल्यात. वैयक्तिक चौथ्या षटकांत शेवटच्या दोन चेंडूंवर दोन विकेट घेत त्याने रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, फलकावरील धावा कमी पडल्या. त्यानंतर पंजाबविरुद्ध 4 विकेट घेतल्या.

22 वर्षीय उम्रान केवळ 2 प्रथमश्रेणी एक लिस्ट ए सामना खेळला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याच्या अ संघाद्वारे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. मात्र, आयपीएलमध्ये 150 किमी प्रतितास वेगाने बॉलिंग टाकताने त्याने समीक्षकांसह माजी क्रिकेटपटूंकडून वाहव्वा मिळवली आहे. उम्रानला करारबद्ध करण्यासाठी हैदराबादने 4 कोटी मोजलेत. त्याने संधीचे सोने करताना संघमालकांचा विश्वास जिंकला आहे. (IPL 2022)

लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा मध्यमगती गोलंदाज अवेश खाननेही छाप पाडली आहे. दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या या 25 वर्षीय मध्य प्रदेशच्या बॉलरने 7 सामन्यांत 11 विकेट मिळवल्या आहेत.

22 वर्षीय पंजाबचा लेगस्पिनर राहुल चहर (8 सामन्यांत 10 विकेट), बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचा मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेल (8 सामन्यांत 10 विकेट), राजस्थानचा मध्यमगती गोलंदाज एम. प्रसिध कृष्णा यांनी (8 सामन्यांत 10 विकेट) यंदाच्या हंगामात छाप पाडली आहे.

युवा फलंदाजांमध्ये मुंबई इंडियन्सचा डावखुरा फलंदाज एन. तिलक वर्माची दखल घ्यावी लागेल. मुंबईवर सलग आठ पराभवांची नामुष्की ओढवली तरी हैदराबादच्या या अष्टपैलू क्रिकेटपटूने 8 सामन्यांत 45.33च्या सरासरीने 272 धावा फटकावल्या आहेत. त्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या दमदार हाफसेंच्युरींचा समावेश आहे. त्यानंतर दोन सामन्यांत तिलक वर्माने 35हून अधिक धावा केल्यात. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनंतर त्याच्याच सर्वाधिक धावा आहेत. (IPL 2022)

अन्य फलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा शिवम दुबेची बंगळूरुविरुद्धची 95 धावांची खेळी लक्षात राहणारी आहे. हैदराबादचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या 65 धावा, बंगळूरुचा विकेटकीपर-फलंदाज अनुज रावतची मुंबईविरुद्धची 66 धावांची खेळी लक्षवेधक ठरली आहे. (उत्तरार्ध)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news