आप लढविणार पुणे महापालिकेच्या सर्व जागा | पुढारी

आप लढविणार पुणे महापालिकेच्या सर्व जागा

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : पंजाबमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर, तसेच चंदीगड आणि गुजरातेतील सुरत महापालिका निवडणुकीत चांगल्या जागा मिळविल्यानंतर, आम आदमी पक्षाची (आप) नजर आता महाराष्ट्राकडे वळली आहे. पुणे महापालिका निवडणुकीतील सर्व 173 जागांवर उमेदवार उभे करण्याचे आपने ठरविले आहे. त्यासाठीच्या राजकीय हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत.

देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा, तुफान दगडफेक करत प्रवाशांना लुटले, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांचा हैदोस

दीपक सिंघला महाराष्ट्राचे प्रभारी

दिल्लीतील नेते दीपक सिंघला यांची पक्षाने महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या विविध समित्यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर काही संभाव्य उमेदवारांची निवडही केली असून, त्यांच्यासोबत त्या प्रभागातील व्यूहरचनेला अंतिम स्वरूप दिले जात आहे. पुण्यात किमान 20 ते 25 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.

Hijab Row : कर्नाटकात हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना १२ वी परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारली

आपची स्थापना होऊन अद्याप दहा वर्षेही पूर्ण झाली नसताना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबीज केली आहे. पाठोपाठ राज्यसभेच्या पाच जागा त्यांना मिळाल्या. चंदीगड महापालिका निवडणुकीमध्येही त्यांनी भाजपला जोरदार टक्कर दिली. सुरतमध्येही आपने काँग्रेसला मागे टाकले.

बंटी आणि बबली येत असतील तर येऊ देत, संजय राऊतांची राणा दाम्पत्यांवर टीका

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी सर्व महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आपची दमदार वाटचाल, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याची हातोटी, दिल्लीत मोफत वीज, चांगली शिक्षण सुविधा, औषधोपचार देण्यात पक्षाला आलेेले यश याचा त्यांना प्रचारात फायदा होईल.

नवाब मलिकांना आणखी एक दणका, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

कुंभार म्हणाले, ‘या सर्व प्रश्नांचा पक्षाने साकल्याने विचार केला आहे. त्यांची सोडवणूक करण्यासाठी संबंधित घटकांना सोबत घेऊन धोरण ठरविण्यात येईल. पुण्यात आपच्या रिक्षा संघटनेचे बारा हजार सभासद आहेत. त्यांनी मेट्रो रेल्वेसोबत करार केला आहे. दहा रिक्षाचालकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहोत.’ ते म्हणाले, ‘पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व जागा लढविणार आहोत. पुण्यात दहा ठिकाणी पक्षाची कार्यालये स्थापन झाली आहेत.’

Electric Scooter : ई-बाईकच्या दुर्घटना टाळण्यासाठी तज्ज्ञ समिती : मंत्री नितीन गडकरी

पुण्यात पीएमपीमध्ये महिला व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, सर्वांना पुरेसा पाणीपुरवठा, शिक्षणात सुधारणा, कचरा समस्या या मूलभूत मुद्द्यांवर आम्ही भर देणार आहोत. त्यासाठी लवकरच आंदोलन करण्यात येईल. न्यायाधीश, वकील, डॉक्टर यांच्यासह रिक्षाचालक आपमध्ये आले आहेत. 50 टक्के उमेदवारी तरुणांना देण्यात येईल. पुण्यातील सर्व जागा आम्ही लढविणार आहोत.

                                                                       – विजय कुंभार, राज्य संघटक, आप.

Back to top button