बंटी आणि बबली येत असतील तर येऊ देत, संजय राऊतांची राणा दाम्पत्यांवर टीका | पुढारी

बंटी आणि बबली येत असतील तर येऊ देत, संजय राऊतांची राणा दाम्पत्यांवर टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंटी आणि बबली येत असतील तर येऊ देत. राणा दाम्पत्य स्टंटबाजी करत आहे. स्वत:ची मार्केटींग करण्यासाठी त्यांची ही स्टंटबाजी सुरू आहे. हिंदूत्वाला मार्केटिंगची गरज नाही. तर हनुमान चालिसा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. शिवसेने विरोधात अशा सी ग्रेड लोकांचा वापर केला जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशार दिला होता. त्यानंतर आज ते मुंबईत ते दाखल झाले आहे. राणा दाम्पत्य मुंबईत छुप्या पद्धतीने येऊन हनुमान पठण करण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल म्हणाले होते की, संजय राऊत नागपूरला येत आहेत त्यांना सदबुद्धी मिळेल. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे सुपुत्र आहेत. ते जर आम्हाला नागपूरला आल्यानंतर सदबुद्धी मिळेल असे म्हणत असतील तर दोन वर्षांपासून त्यांच्यावर जी वेळ आली आहे ती आली नसती. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

हेही वाचलतं का

Back to top button