पुण्यातील केवळ साडेसहा हजार जणांना तिसरा डोस | पुढारी

पुण्यातील केवळ साडेसहा हजार जणांना तिसरा डोस

पुणे: पुढारी वृत्तसेवा: केंद्र शासनाने 18 व त्यापुढील वयोगटाला तिसरा डोस खासगी रुग्णालयांत सूरू केल्यावर गेल्या नऊ दिवसांत पुण्यातील केवळ साडेसहा हजार लाभार्थ्यांनी पैसे खर्च करून तिसरा डोस घेतला आहे. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील 1193 तर 45 ते 60 वयोगटात 5 हजार 228 नागरिकांनी तिसरा डोस घेतला. तिसरा डोस घेणार्‍यांची संख्या आता मंदावली आहे.
केंद्राने 10 एप्रिलपासून ज्यांना दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत, अशा लाभार्थ्यांना तिसरा डोस केवळ खासगी लसीकरण केंद्रात देण्यास परवानगी दिली आहे. अजून शासकीय लसीकरण केंद्रांत हा डोस सुरू केलेला नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात 386 रुपये देऊन  तिसरा डोस घेण्यासाठी नागरिक अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये 18 ते 45 वयोगटात प्रतिदिन 50 ते 175 दरम्यान डोस देण्यात आले, तर 45 ते 60 वयोगटात 200 ते 500 पर्यंत नागरिकांना दैनंदिन डोस देण्यात आले. केवळ 16 एप्रिलला जास्त लसीकरण झाले असून ती संख्या एक हजार होती.
कोरोनाची लाट संपली आहे. तसेच उन्हाचा तडका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खासगी रुग्णालयांत अद्याप डोस सुरू न झाल्याने आतापर्यंत केवळ साडेसहा हजार नागरिकांनीच तिसरा डोस घेण्यास पसंती दिल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी दिली.
हेही वाचा:

Back to top button