Suicide : ८ वर्षांत ४००० भारतीयांनी परदेशांत केल्या आत्महत्या; आखाती देशांत सर्वाधिक | पुढारी

Suicide : ८ वर्षांत ४००० भारतीयांनी परदेशांत केल्या आत्महत्या; आखाती देशांत सर्वाधिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आखाती देश भारतीयांनी नोकरी तर देतात; पण त्याच देशांमध्ये भारतीयांची आत्महत्या करण्याचे प्रमाणही जास्त आहे. २०१४ पासून आतापर्यंत या ८ वर्षांमध्ये सुमारे ४००५ भारतीयांनी परदेशात आत्महत्या केलेल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त १,१२२ आत्महत्यांची नोंद या संयुक्त अरब अमिरात (UAE) येथे झालेली आहे. परदेशात झालेल्या भारतीयांच्या आत्महत्यांबाबत खासदार कुंवर दानिश अली यांनी लोकसभेत प्रश्न विचारला होता. त्याला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लेखी उत्तर दिले आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, “यातील बहुतांशी आत्महत्या या कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे झालेल्या आहेत.” दुसरीकडे तज्ज्ञांच्या मतानुसार नोकरीसाठी परदेशात गेलेले भारतीय प्रचंड दबावात काम करतात. त्यामुळे परदेशातील भारतीयांच्या आत्महत्येत वाढ होत आहे.”

परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, “भारत सरकारकडून “प्रवासी भारतीय सहाय्य केंद्रा’तर्फे भारतीय प्रवाशांना मदत केली जाते. त्यांच्या अडचणींचे निराकरण करते. समुपदेशक अधिकाऱ्यांना संकटग्रस्त भारतीयांच्या अडचणी सोडविण्याचे काम दिलेले आहे. तसेच परदेशातील भारतीयांच्या तक्रारी सोडविण्यासाठी MADAD नावाचे पोर्टही चालवले जात आहे. तसेच २४ त्यांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाईनही निर्माण करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संकटात असलेल्या परदेशातील भारतीय नागरिकांना ‘इंडियन कम्युनिटी वेल्फेअर फंड’ यांच्याकडून आर्थिक मदत केली जाते.”

 

हे वाचलंत का? 

Back to top button