Mumbai Airport :'अदानी एअरपोर्ट' फलक शिवसैनिकांनी उखडून फेकला!
मुंबई; पुढारी ऑनलाईन : Mumbai Airport : राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट असा फलक लावला. यानंतर अखिल भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी उखडून फेकला. मुंबई विमानतळावर अदानींचे नामफलक झळकल्याने शिवसैनिक संतप्त झाले.
- corona third wave चालू महिन्यातच, ऑक्टोबरमध्ये ‘पिक पिरियड’
- #ArrestLucknowGirl हा ट्विटरवर ट्रेंड, काय आहे नेमकं प्रकरण?
देशातील सात आंतरराष्ट्रीय विमानतळांचा ताबा अदानी समूहाकडे आहे. अलीकडेच मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा सुद्धा जीव्हीकेकडून अदानी समूहाकडे आला आहे. ताबा आल्यानंतर अदानी समूहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच अदानी एअरपोर्ट असा फलक लावला होता.
- तळीये दुर्घटना ग्राऊंड रिपोर्ट : ‘गावकऱ्यांचा आक्रोश तुला ऐकू आला नाही का रे!’
- १६ कोटींचे इंजेक्शन दिलेल्या पुण्याच्या वेदिका शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू
यानंतर या बोर्डवर शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानी फलक झळकल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर व्यक्त केली होती. खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
हे ही वाचलं का?