#ArrestLucknowGirl हा ट्विटरवर ट्रेंड, काय आहे नेमकं प्रकरण? | पुढारी

#ArrestLucknowGirl हा ट्विटरवर ट्रेंड, काय आहे नेमकं प्रकरण?

लखनौ (उत्तर प्रदेश); पुढारी ऑनलाईन: #arrestlucknowgirl हा ट्रेंड सध्या ट्विटरवर ट्रेंड सुरू आहे. परंतु काही जणांना #arrestlucknowgirl हा काय प्रकार आहे? हे माहित नाही. त्यामुळे सध्या या प्रकाराबद्दल आपण जाणून घेऊयात.

उत्तरप्रदेश लखनौ येथील ३१ जुलै रोजी एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड झाला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुणी एका कार चालकाला बेदम मारहाण केल्याचे निदर्शनास आले होते.

अधिक वाचा 

हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला असून यावर अनेक ठिकाणी चर्चा होत आहेत. मात्र, परवाच्या या व्हिडिओनंतर आता कालच एक नवा व्हिडिओ आला असून, यात ती मुलगी रस्ता ओलांडताना दिसत आहे.  या व्हिडिओत ती मुलगी रास्ता ओलांडताना लाल असणारा सिग्नल हिरवा झाल्याचे दिसते. मात्र, तिला त्या कारचा धक्का लागला आहे की नाही हे स्पष्ट दिसत नाही.

अधिक वाचा 

त्या मुलीने लगेचच कार चालकाला बाहेर ओढून मारायला सुरवात केली. जवळपास दोन ते अडीच मिनिटे सलग त्या कार चालकाला अमानुष मारहाण केल्याचे दिसते आहे. या कार चालकास आता ट्विटरवरून सहानभूती मिळत आहे. तर मारहाण करणाऱ्या मुलीस अटक करण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

अधिक वाचा 

उत्तर प्रदेश पोलिसांना या सर्व ट्विटमध्ये मेन्शन केले जात आहे. तसेच काहीजण मानव अधिकार कुठे आहेत? असे संतप्त सवाल विचारत आहे.

समजा मुलीच्या जागी मुलगा असता तर आता काय परिस्थिती असती असाही सवाल नेटकरी करत आहेत. हे सर्व ट्विट पाहण्यासाठी आपण #arrestlucknowgirl या ट्रेंडवर क्लिक करून पाहू शकता.

हेही वाचलंत का? 

Back to top button