संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

corona third wave चालू महिन्यातच, ऑक्टोबरमध्ये ‘पिक पिरियड’

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चालू ऑगस्ट महिन्यातच corona third wave येणार असून ऑक्टोबरमध्ये या लाटेचा 'पिक पिरियड' असेल, असा अंदाज आयआयटीच्या तज्ज्ञांनी गणितीय मॉडेलच्या आधारे वर्तवला आहे. आयआयटी हैदराबादचे मधुकुमल्ली विद्यासागर तसेच आयआयटी कानपुरचे मनिंद्र अग्रवाल यांनी हा अहवाल तयार केला आहे.

corona third wave घातक होण्याचे टाळावयाचे असेल तर वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 47 कोटी 22 लाख 23 हजार 649 डोसेस देण्यात आले आहेत.

तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी भयावह असणार नाही

गेल्या २४ तासात 17 लाख 6 हजार 598 डोसेस देण्यात आले आहेत. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी भयावह असणार नाही. पण तरीही नागरिकांना व आरोग्य व्यवस्थेला दक्षता घ्यावी लागेल.

तिसऱ्या लाटेवेळी दिवसाला रूग्ण संख्येत सुमारे एक लाखाने भर पडू शकते. स्थिती जास्च बिघडली तर हा आकडा दीड लाखांवर जाऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे.

दुसऱ्या लाटेवेळी दिवसाला रूग्ण संख्येत तब्बल चार लाखाने भर पडत होती.

तिसऱ्या लाटेदरम्यान रूग्ण संख्या किती राहणार, हे महाराष्ट्र तसेच केरळसारख्या राज्यांवर अवलंबून राहणार आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतासह अनेक देशात कोरोनाच्या डेल्टा प्रकाराने हाहाकार उडविलेला आहे.

गेल्या २४ तासाचा विचार केला तर या कालावधीत रूग्ण संख्येत 40 हजार 134 ने भर पडली आहे.

याचवेळी बरे झालेल्यांची संख्या 36 हजार 946 इतकी नोंदवली गेली असून मृतांचा आकडा 422 इतका आहे.

देशात आतापर्यंत कोरोनाने 3 कोटी 16 लाख 95 हजार 958 रूग्ण सापडले आहेत.

सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 13 हजार 718 इतकी आहे. कोरोनाने आतापर्यंत 4 लाख 24 हजार 773 लोकांचा बळी घेतलेला आहे.

हे ही वाचलं का? 

logo
Pudhari News
pudhari.news