सांगली : सुर्यगाव येथील तरूण कृष्णेत बुडाला | पुढारी

सांगली : सुर्यगाव येथील तरूण कृष्णेत बुडाला

पलूस (जि.सांगली), पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्‍हातील सुर्यगाव येथील सागर महादेव सुर्यवंशी (वय ३६) हा तरूण कृष्णा नदीकाठी पोहताना दम लागून बुडाला.

ही घटना शुक्रवारी (दि.15) दुपारी घडली. सागर याच्या घरी आई, पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार, हा तरूण सुर्यगावच्या पाणवठ्यावरून बुर्लीच्या बाजूला पैलतीरावर पोहत आला. मात्र पैलतीर वीस-तीस फुट अंतरावरअसतानाच दम लागल्याने बुडाला. ही बाब पाणवठ्यावरून पाहणाऱ्या जयकर रणनवरे, रोहन सुर्यवंशी, प्रथमेश सुर्यवंशी, श्रेयश सुर्यवंशी, संकेत सुतार, ओम रकटे या तरूणांनी पाण्यात उड्या टाकून वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र ते पैलतीरावर पोहचेपर्यंत सागर बुडाला होता. त्‍यानंतर या तरूणांनी त्‍याचा बराच वेळ शोध घेतला, परंतु तो सापडला नाही.

भारती रेस्क्यू टिमला याबाबत माहिती मिळताच आमणापूर ग्रामपंचायतीच्या बोटीसह रेस्क्यू टिमचे गजानन नरळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील तरूणासह या टिमची संध्याकाळपर्यंत शोधमोहीम सुरु होती. या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

हेही वाचलं का  

Back to top button