महागाईचा कळस सुरुच ! आता गोकुळच्या दूध विक्री दरात लिटरला ४ रुपयांची वाढ

महागाईचा कळस सुरुच ! आता गोकुळच्या दूध विक्री दरात लिटरला ४ रुपयांची वाढ

कोल्‍हापूर; पुढारी वृत्तसेवा : गोकुळने दुधाच्‍या विक्री दरामध्‍ये प्रति लिटर ४ रुपये दरवाढ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीची अंमलबजावणी शनिवार (दि. १६) पासून करण्‍यात येणार आहे. गोकुळचे अध्‍यक्ष विश्वास पाटील यांनी ही माहिती दिली.

गोकुळच्‍या वतीने काही दिवसापुर्वी दूध उत्‍पादक शेतकर्‍याला प्रति लिटर २ रुपये वाढ जाहीर केली होती. तेव्‍हाच विक्री दरात वाढ होणार हे अपेक्षित होते. परंतू निवडणुकीत विक्री दरामध्‍ये वाढ न करता दूध उत्‍पादकांना दरवाढ देणार असे गोकुळच्‍या निवडणुकीत नेत्‍यांनी सांगितले होते. सत्ता आल्‍यानंतर नूतन संचालकांनी देखील विक्री दरात वाढ न करता दूध उत्‍पादकाला दरवाढ देता येते असे सांगितले होते. त्‍यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. परंतू हा दिलासा फार काळ टिकला नाही. सत्तेवर येऊन वर्ष होण्‍याअगोदर गोकुळच्‍या नूतन संचालकांनी ग्राहकांनी दरवाढीचा झटका दिला आहे.

दूध २ रुपये वाढ ग्राहकाला मात्र ४ रुपयाचा भुर्दंड

गोकुळच्‍या खरेदी दरात वाढ झाली की तेवढीच वाढ विक्री दरात केली जायचे. नूतन संचालकांच्‍या काळात मात्र दूध उत्‍पादकाला २ रुपयाची वाढ करण्‍यात आली मात्र ग्राहकांकडून ४ रुपये वसुल करण्‍यात येऊ लागल्‍याने जिल्‍ह्यात तो चर्चेचा विषय बनला आहे.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news