बारामती : उपमुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त | पुढारी

बारामती : उपमुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त

बारामती, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत पोलिस प्रशासन सतर्क झाले. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असणाऱ्या सहयोग सोसायटीसमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आज अचानक एसटी कामगारांनी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आंदोलन केले. या वेळी चप्पलफेक आणि दगडफेकदेखील करण्यात आली. या आंदोलनानंतर बारामतीत पोलिस सतर्क झाले आहेत. यानंतर सहयोग सोसायटी येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्‍थनी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी यांच्या खासगी निवासस्थानी कोणतेही आंदोलन केल्यास ते बेकायदेशीर असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिला आहे.

 

Back to top button