मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी किरीट सोमय्यांचे षडयंत्र; संजय राऊतांचा गंभीर आरोप | पुढारी

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी किरीट सोमय्यांचे षडयंत्र; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी किरीट सोमय्यांचे षडयंत्र सुरु आहे. त्यासाठी केंद्रात प्रेझेंटेंशन सुरु आहे. भाजपच्या ५ लोकांनी हे प्रेझेंटेंशन तयार केले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करुन मुंबईत केंद्राचे राज्य आणायचा प्रयत्न सुरु आहे. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या कटकारस्थानाचा सोमय्या हे सूत्रधार आहेत. त्यांना मुंबईतून कोण बिल्डर मदत करतो. जो भाजपचा फायनान्सर आहे. हे आम्हाला माहित आहे. महाराष्ट्रातील धनदांडग्या व्यक्तींचे नेतृत्व सोमय्या करत आहेत, असे आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.

केंद्र सरकारच्यामदतीने आमचे फोन टॅप झाल्याचा दावा राऊतांनी केला आहे. त्यांनी पुन्हा एकदा आयएनएस विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी पैसे गोळा केल्याचा मुद्दा उपस्थित केला. ”पैसे जमा केले की नाही हा माझा साधा प्रश्न आहे. मी त्याला सोडणार नाही. त्याची आणखी १० प्रकरणे आहेत. या प्रकरणांचा तपास केंद्रीय यंत्रणांनी करायला हवा, पण ते करत नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

नौटंकी बंद करा. विक्रांतच्या नावावर किती पैसे गोळा केले हो पोलिस चौकशीत कळेल. कशाला फसवता?. भाजप या गैरव्यवहाराचे समथर्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलूंडचे जे महात्म आहेत ते ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ असे आहेत. देशद्रोह्यांच्या समथर्न करु नका. किरीट सोमय्या हा अफजल गुरु आणि कसाब सारखाच आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी काही वर्षांपूर्वी निधी जमा केला होता. त्या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता.

सोमय्या यांच्या नीलमनगरमधील कार्यालयात आयएनएस विक्रांतसाठी जमा झालेला पैसा एकत्र करण्यात आला. त्यानंतर तेथून तो वितरीत करण्यात आला, तसेच पीएमसी बँकेत या काळ्या पैशाला व्हाईट करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. हा पैसा सोमय्या यांनी निवडणुकीत वापरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button