गंभीर आरोप करणाऱ्या राऊतांनी पुरावे द्यावेत : किरीट सोमय्या | पुढारी

गंभीर आरोप करणाऱ्या राऊतांनी पुरावे द्यावेत : किरीट सोमय्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय राऊत यांनी आतापर्यंत 17 आरोप केलेत, मात्र पुरावे कुठे आहेत? आरोप करणाऱ्या राऊतांनी पुरावे द्यावेत. असे आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देत असताना आज ते बोलत होते.

संजय राऊत यांनी त्यांच्यावर लावलेल्या ईडी चौकशीवर पत्रकारांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर येत आहेत, माणूस दबावात आल्यानंतर आरोप करतो.

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील या आरोप प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर ते संतप्त झाले आहेत. त्यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेले पैसे सोमय्यांनी खाल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

हेही वाचा

Back to top button