Koo App : ‘कू’ने आणले नवे फिचर; सोशल मीडियावरील पारदर्शकता, विश्वासार्हता वाढणार | पुढारी

Koo App : ‘कू’ने आणले नवे फिचर; सोशल मीडियावरील पारदर्शकता, विश्वासार्हता वाढणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचा पहिला बहुभाषिक मायक्रो – ब्लॉगिंग मंच Koo App (कू ऐप) ने ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन फीचर लॉन्च केले आहे. हे करणारा कू जगातला सर्वात पहिला सोशल मीडिया मंच बनला आहे. कुणीही युजर आता आपल्या शासनाने अधिकृत मंजूरी दिलेले ओळखपत्र वापरून अगदी काही क्षणात स्वत:ला सेल्फ व्हेरिफाय करू शकतो. यातून युजर्स मंचावर आपल्या खात्याची अस्सलता सिद्ध करण्यास सक्षम बनतात. सोबतच युजर्सनी शेअर केलेले विचार आणि मतंही यातून विश्वासार्ह बनतात. ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन हे सच्च्या आवाजांना ठळकपणे अधोरेखित करते.

या प्रक्रियेनंतर हिरव्या रंगाचा टिक (Green Tick) यूजरच्या अकाउंटला सेल्फ-वेरिफाइड झाल्याच्या रुपात एक खास ओळख देईत. Koo App असा पहिला ‘महत्त्वपूर्ण सोशल मीडिया मध्यस्थ’ आहे, ज्याने माहिती तंत्रज्ञान (मध्यवर्ती दिशानिर्देश आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता) नियम, 2021 च्या नियम 4(7) नुसार या फीचरला सक्रीय केले आहे.

या फीचरच्या माध्यमातून यूजर्स सरकारी ओळखपत्राचा क्रमांक ‘कू’वर भरतात. त्यानंतर फोनवर आलेला ओटीपी टाकतात आणि यशस्वी प्रमाणीकरण झाल्यावर त्यांच्या प्रोफाइल्स हिरव्या रंगाच्या टिकसह सेल्फ-वेरिफाई होतात. ही सगळी प्रक्रिया अगदी काही क्षणातच पूर्ण होते. विशेष म्हणजे ही सगळी प्रक्रिया सरकारद्वारे, अधिकृत थर्डपार्टी द्वारे केली जाते. या प्रक्रियेदरम्यान Koo App यासंबंधीची कुठलीच माहिती स्वत:कडे साठवत नाही.

प्लॅटफॉर्मवर यूजर्सना सशक्त बनवण्यासह प्रामाणिकतेला प्रोत्साहन देत ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन स्तरावर चुकीची माहिती, अभद्र भाषा, वाईट वर्तन आणि फसवणुकीला आळा बसेल अशीही आशा आहे.

Koo App चे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “सोशल मीडियावर विश्वास आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यात Koo App सर्वात पुढे आहे. ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन प्रणाली सुरू करणारा जगातला पहिला मंच म्हणवून घेताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. यूजर्स आमच्या सुरक्षित पडताळणी प्रक्रियेच्या माध्यमातून काही सेकंदातच सेल्फ-वेरिफिकेशन मिळवू शकतात. हे यूजर्सला आधिक पारदर्शकता देण्यासह मंचावर जबाबदार व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. बहुतांश सोशल मीडिया मंच हा विशेषाधिकार केवळ काहीच खात्यांना देतात. Koo App असा पहिला मंच आहे ज्याने आता हरेक यूजरला समान विशेषाधिकार मिळवण्याचा हक्क दिला आहे.”

ऐच्छिक स्व-पडताळणीसंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. ‘कू’ वापरकर्त्याचा आधार क्रमांक संग्रहित करते का ?
नाही. ‘कू’ आधार क्रमांक स्वतःकडे संग्रहित करत नाही. आधार क्रमांक प्रमाणित करण्यासाठी UIDAI मान्यताप्राप्त तिसऱ्या घटकाची (थर्ड पार्टी) सेवा वापरली जाते.

२. प्रमाणीकरणानंतर माझे आधार कार्ड तपशील ‘कू’ वर दिसतील का ?
नाही. हे तपशील फक्त यूजर्सची सत्यता प्रमाणित करण्यासाठी वापरले जातात.

३. इतर यूजर्सना माझे नाव आणि आधार माहिती यांची महिती मिळते का ?
नाही. यूजर्सच्या प्रोफाईलवरील तपशील पडताळणीपूर्वी जसा होता तसाच राहतो.

४. ‘कू’वर माझे आधार तपशील नोंदवणे सुरक्षित आहे का ?
होय. Koo वरची ऐच्छिक सेल्फ-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे. ही पडताळणी प्रक्रिया भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) अधिकृत थर्ड-पार्टीद्वारे केली जाते. ‘कू’ यूजरचा कोणताही डेटा साठवून ठेवत नाही.

५. ‘कू’ युजरने हे का करावे?
जो युजर त्याच्या / तिच्या प्रोफाइलची पडताळणी करतो तो एक अधिकृत, खरा वापरकर्ता म्हणून ओळखला जातो. साहजिकच त्या व्यक्तीच्या विचार आणि मतांना अधिक विश्वासार्हता मिळते. ऐच्छिक स्व-सत्यापन हे ‘कू’च्या प्लॅटफॉर्मवर खऱ्या, अस्सल आवाजांना प्रोत्साहन देते. यातून युजरला एरवी काही प्रतिष्ठित खात्यांनाच मिळणारा पडताळणीचा विशेषाधिकारदेखील प्राप्त होतो.

Voluntary Self Verification

काय आहे कू?

‘कू’ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. सध्या Koo मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ, आसामी, पंजाबी आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. Koo ॲप भारतीयांच्या आवाजाचे लोकशाहीकरण करून त्यांना विचार शेअर करण्यासह आवडीच्या भाषेत मुक्तपणे व्यक्त होण्यास सक्षम बनवते. ‘कू’च्या अनोख्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, भाषांतर सुविधा. हे वैशिष्ट्य मूळ मजकुरातली भावना आणि संदर्भ जसेच्या तसे राखत युजर्सना त्यांचा संदेश विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून पाठवण्याची रिअल टाइम सुविधा देते. नुकतेच ‘कू’ने 3 कोटीहून अधिक डाउनलोड्स आहेत. राजकारण, क्रीडा, माध्यम, कला, अध्यात्म या क्षेत्रातील 7 हजाराहून जास्त दिग्गज Koo च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नियमित संवाद साधत असतात.

Back to top button