Petrol Diesel Prices : १३७ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर | पुढारी

Petrol Diesel Prices : १३७ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा दर

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : पाच राज्यांच्या निवडणुका संपताच केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दि.22 मार्च आज मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या प्रती लीटर दरात 85 पैशांनी वाढ झाली. ही वाढ 137 दिवसानंतर झाली आहे. यामुळे आता पेट्रोल 110 रूपये 14 पैसे लीटर वरून 110 रूपये 99 पैशांवर पोहचले तर डिझेल 94 रूपये 30 पैशावरून 95 रूपये 16 पैशावर आले. ही दरवाढ पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर होणार होती.अशी माहिती पेट्रोल पंपचालक यांनी दिली.

मार्चमध्ये निवडणूकांचे निकाल लागताच अवघ्या आठवडा पूर्ण होताच केंद्राने ही इंधन दरवाढ केली. यामुळे आता पुन्हा एकदा वाहतुकदारांकडून गाडी भाड्यात वाढ होईल. यामुळे सहाजिकच परिणाम जीवनावश्यक वरस्तूच्या खरेदी- विक्रीवर होऊन दरवाढीची झळ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे. आतापर्यंत झालेल्या इंधन दरवाढीने भाजीपाला, अन्नधान्याच्या दरात किरकोळ बाजारात वाढ झाली होती. ही दरवाढ केवळ इंधन दरवाढीने होत असल्याची माहिती किरकोळ व्यापारी, वाहतुकदारांकडून दिली जाते. याचा परिणाम आणखी रिक्षा शेरिंग भाड्यावर होण्याची दाट शक्यता आहे. लांब पल्याच्या लक्झरी भाड्यात ही काही अंशी वाढ होण्याचे संकेत आहे.

या शहरांमध्‍ये पेट्रोल-डिझेल दरात इतकी वाढ होणार…  ( दर रु. प्रतिलीटर  )

मुंबई :  डिझेल : ९५. १६ , पेट्रोल : ११०.९९

कोलकाता : डिझेल : ९०.६२, पेट्रोल : १०५.५१

चेन्नई :  डिझेल : ९२.१९ , पेट्रोलची १०२.१६

बंगळुरू : डिझेल : ८५.०१,  पेट्रोल  १००.५८

हैदराबाद : डिझेल : ९४.६२, पेट्रोल १०८.२०

पटना :  डिझेल ९१.०९ :  पेट्रोल १०५.९०

भोपाल :  डिझेल ९०.८७ : पेट्रोल १०७.२३

जयपूर : डिझेल ९०.७० : पेट्रोल १०७.०६

लखनऊ : डिझेल ८६.८० : पेट्रोल ९५.२८

इतर शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Prices) किती वाढल्या आहेत, ते जाणून घेण्यासाठी इंडियन ऑयल यांच्या संकेतस्थळावर तपासू शकता. तिथे नवे दर तुम्हाला दिसू शकतील. वरील किंमती या आज सकाळी ६ वाजताच लागू करण्यात आल्‍या आहेत. सोमवारी जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमतींनी सोमवारी उसळी मारली. त्यामुळे ब्रेंट ऑईल ११८.९६ डाॅलर प्रति बॅलरवर पोहोचले.

हे वाचलंत का?

Back to top button