शंभर वर्षांच्या माशास मिळाले जीवदान | पुढारी

शंभर वर्षांच्या माशास मिळाले जीवदान

टोरांटो :  कॅनडातील यवेस बिस्सन या मच्छीमाराने अलीकडेच बिटिश कोलंबियामध्ये एक मासा पकडला. मात्र, हा मासा साधा नव्हता तर ज्यांना ‘जिवंत जीवाश्म’ असे म्हटले जाते त्या डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या स्टर्जन प्रजातीचा मासा होता. मच्छीमाराने पकडलेल्या या माशाचे वय सुमारे शंभर वर्षे होते. यवेसने तत्काळ या माशाला सुरक्षितपणे पाण्यात जाऊ दिले.

या माशाचा एक व्हिडीओही आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. 250 किलो वजनाच्या या माशाची लांबी दहा फूट होती. पकडल्यानंतर या माशाचे मोजमाप घेण्यात आले आणि त्याच्यावर ‘आरएफआयडी’ चिप टॅग करण्यात आली. यवेस बिस्सन हे एक मच्छीमार तर आहेतच; पण ते स्टर्जन प्रजातीच्या माशांचे एक तज्ज्ञही आहेत. त्यांनी फजर नदीतील अशा माशांविषयी बरीच माहिती मिळवली आहे. या माशाला उथळ पाण्यातून खोल पाण्यात ओढून नेऊन सोडण्यात आले. त्याला तोंडाकडील भागाकडे पकडून यवेस यांनी खोल पाण्यात खेचून नेले. याबाबतचा व्हिडीओ आता व्हायरलही होत आहे.

 

Back to top button