

संदीपराव मांडवे/औंध, पुढारी वृत्तसेवा : औंध जिल्हा परिषद गटासह खटाव तालुक्यात जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही माजी सभापती व पंचायत समिती सदस्य संदीपराव मांडवे यांनी दिली.
औंध येथील हायमास्ट लॅम्प लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस हणमंतराव शिंदे, औंधच्या सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दिपक नलवडे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी इंगळे, अनिल माने, शितल देशमुख, वाहिला मुल्ला, गणेशराव देशमुख पस्थित होते.
संदीप मांडवे म्हणाले, औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव-माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोट्यवधींची विकासकामे सुरु आहेत. पुढील काळात रस्ते, पाणी, वीज व अन्य नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.
हणमंतराव शिंदे म्हणाले, गायत्रीदेवी यांच्या नेतृत्वामुळे औंध परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढील काळातही त्या अनेक योजना, विकास कामे औंध परिसरात राबवणार आहेत.