वालचंदनगर कंपनीमध्ये ‘प्लेनम शेल’ उपकरणाची यशस्वी निर्मिती | पुढारी

वालचंदनगर कंपनीमध्ये ‘प्लेनम शेल’ उपकरणाची यशस्वी निर्मिती

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा

भारतीय अवकाश संशोधन संस्था अवकाशातील पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी स्वदेशी ‘विंड टनेल’ उपकरण बनवत आहे. त्यासाठी लागणारे ‘प्लेनम शेल’ उपकरण वालचंदनगर कंपनीने बनवले असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी दिली.

बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर हल्ला, २०० लोकांच्या जमावाकडून तोडफोड आणि लुटमार

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीने आजवर भारतीय संरक्षण दल व अवकाश संशोधन संस्थेसाठी अनेक उपकरणांची यशस्वी निर्मिती केली आहे. देशातील मोजक्या कंपन्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यामध्ये वालचंदनगर कंपनी नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे.

आता ओमायक्रॉनच्या नव्या stealth व्हेरिएंटची दहशत; दक्षिण कोरिया, पश्चिम युरोपमध्ये हाहाकार

सध्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरकडून रॉकेटने अवकाशामध्ये उड्डाण केल्यानंतर वातावरणातील दाबाचा यानाच्या उपकरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जमिनीवरच स्वदेशी ‘ट्रायसोनिक विंड टनेल प्रोजेक्ट’ विकसित केला आहे. इस्त्रोच्या या महत्वकांक्षी प्रकल्पात वालचंदनगर कंपनीचा मोलाचा वाटा असून, ‘ट्रायसोनिक विंड टनेल’साठी लागणारी पाच उपकरणे कंपनीने यशस्वीरीत्या बनवली आहेत. त्यामध्ये सेटलिंग चेंबर, फ्लेक्सिबल नोझल व ‘प्लेनम शेल’ या उपकरणाची यशस्वी निर्मिती केली आहे. तसेच मॉडेल कार्ट व एक्सेंजर पाईपिंगची निर्मिती करण्याचे काम सुरु आहे. यातील प्लेनम शेल या उपकरणाची लांबी ५.५ मीटर, रुंदी ३.८ मीटर, उंची ४.९ मीटर, वजन ४६ टन असून बुधवारी (दि. १६) हे उपकरण इस्त्रोकडे हस्तांतरीत करण्यात आले.

तर मुलीला वडिलांकडून आर्थिक मदत घेण्याचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

यावेळी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्नीकृष्णन नायर, टाटा प्रोजेक्टचे मॅनेजर निवासन रंगनाथन हे कार्यक्रमामध्ये ऑनलाइन सहभागी झाले होते. वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चिराग दोशी, फॅक्टरी मॅनेजर धीरज केसकर, असिस्टंट व्हाईस प्रसिडेंट पवनकुमार जैन यांनी हिरवा झेंडा दाखवून उपकरण इस्त्रोकडे रवाना केले. हे उपकरण विकसित करण्यासाठी पंकज पवार, राहुल दोशी, अमित शिरोळकर, श्रीधर पनाडा, नितीन खराडे, चंद्रशेखर विचारे, अतुल पुजारी, संभाजी शेलार आदी कामगारांनी सहभाग घेतला होता.

गांधी कुटुंबातील सदस्याला पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवता येते का ? नियम काय सांगतात..

Back to top button