तर मुलीला वडिलांकडून आर्थिक मदत घेण्याचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल | पुढारी

तर मुलीला वडिलांकडून आर्थिक मदत घेण्याचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलगीने आपल्या वडिलांसोबतचे नाते तोडले असेल. तसेच ती यापुढे त्यांच्याशी नाते कायम ठेवणार नसेल, तर त्या मुलीला वडिलांकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेण्याचा अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा निकाल तलाक संदर्भातील एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिला.

खंडपीठाने याचिकाकर्त्या एका व्यक्तीला नात्यातील कलहामुळे त्याच्या पत्नीपासून तलाक घेण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर दोन महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला १० लाख रूपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम त्याच्या पत्नीला तिच्या उदरनिर्वाहासाठी दिली जाणार आहे.

दरम्यान, या सुनावणीदरम्यान न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, या व्यक्तीच्या २० वर्षीय मुलगीला शिक्षणासाठी व लग्नासाठी वडिलांकडून पैसे घेण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण मुलीच्या वर्तणुकीवरून हे स्पष्ट होत आहे की, मुलगी आपल्या वडिलांशी कोणतेही नाते ठेवू इच्छित नाही. तसेच आपली पुढील वाटचाल कशी करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या मुलीला आहे. त्यामुळेच त्या मुलीला वडिलांकडून आर्थिक मदत घेण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु, वडिलांना वाटल्यास ते आपल्या मुलीला आर्थिक मदत करू शकतात, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

Back to top button