आनंद सुब्रमण्यम यांना CBI ने केली अटक; NSE च्या MD चित्रा रामकृष्ण यांचे होते सल्लागार | पुढारी

आनंद सुब्रमण्यम यांना CBI ने केली अटक; NSE च्या MD चित्रा रामकृष्ण यांचे होते सल्लागार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल स्टाॅक एक्सचेंजचे माजी संचालक अधिकारी आणि चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम यांना चैन्नईमधून रात्री उशिरा सीबीआयकडून अटक करण्यात आली. आनंद सुब्रमण्यम यांच्यावर एनएसईच्या कामकाजात हस्तक्षेप करतात, असा आरोप आहे. ते एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सल्ला देत होते आणि त्यांच्या इशाऱ्यावर काम केले जात होते.

माध्यमांमधून अशा बातम्या येत आहे की, चित्रा रामकृष्ण हिमालयात राहणाऱ्या कोणत्या तरी एक योगीची कामकाजात मदत घेत होत्या. नंतर अशाही बातम्या आल्या की, ते योगी दुसरे-तिसरे कुणी नसून आनंद सुब्रमण्यमच होते, अशाही चर्चा सध्या होत आहेत. सीबीआयच्या सुत्रांनुसार चौकशी दरम्यान चित्रा यांनी स्वतःच पीडित असल्याचा दावा केला आहे आणि त्या कित्येक गोष्टी त्यांना माहीतच नव्हत्या.

चित्रा आपल्या साक्षी वारंवार बदलत आहेत. त्यांनी चौकशीची दिशाभूल केलेली दिसून येत आहे. चित्रा म्हणाताहेत की, “मी निर्दोष आहे आणि जाणीवपूर्वक गोवलं गेलं आहे.” सीबीआयने चित्रा यांच्याशिवाय कथित योगी इशाऱ्यावर नोकरीवर ठेवलेल्या एनएसईचे माजी ग्रूप ऑपरेटिंग अधिकारी आनंद सुब्रमण्यम आणि माजी सीईओ रवी नारायण यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस पाठविण्यात आली आहे.

आनंद सुब्रमण्यम यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस पाठविण्यात आली आहे. चित्रा रामकृष्ण आणि त्यांच्यापूर्वी एनएसईचे सीईओ असणाऱ्या रवी नारायण व आनंद यांना देश सोडून जाण्याचे संकेतामुळे पाऊल उचलले होते. सीबीआयने सेबीची १९२ पानांच्या रिपोर्टच्या आधारावर चित्रा यांच्यावर तक्रार दाखल केली आहे. सेबीच्या या रिपोर्टमध्ये चित्रा यांनी एनएसईती गुप्त माहिती हिमालयातील एक योगीला शेअर केल्याचा आरोप आहे.

Back to top button