बेळगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गांला मिळणार चालना ; प्रकल्पांचे आभासी उद्घाटन | पुढारी

बेळगाव : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गांला मिळणार चालना ; प्रकल्पांचे आभासी उद्घाटन

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
4 हजार खर्चून 238 किमी लांबीच्या पाच महामार्गांचे काम सुरू होणार आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचाही यामध्ये समावेश असून, त्याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी गडकरी 28 रोजी बेळगावला येणार असल्याची माहिती खा. मंगल अंगडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खा. अंगडी म्हणाल्या, जिल्हा क्रिडांगणावर 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. महामार्ग प्रकल्पांचे आभासी उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी करतील. बेळगाव जिल्ह्यांतर्गत येणार्‍या पाच महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. पाच राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी 3 हजार 972 कोटी रू. मंजूर झाले आहेत. हा एकूण मार्ग 238 कि.मी. आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पालकमंत्री गोविंद कार्जोळ व मंत्री सी. सी. पाटील उपस्थित राहतील, असेही खा. अंगडी यांनी सांगितले. यावेळी आ. अभय पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ. संजय पाटील उपस्थित होते.

हे महामार्ग

कर्नाटकातून महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत पुणे-बंगळूर महामार्गाचे सहापदरीकरण, गोवा-जांबोटी-बेळगाव मार्गाचे दुपदरीकरण, विजापूर-मुरगुंडी मार्गाचे दुपदरीकरण व सिद्धापूर ते विजापूर या मार्गाच्या काही किलोमीटरचे दुपदरीकरण होणार आहे.

रशिया -युक्रेन युद्ध :पुढे काय होणार?

हेही वाचलत का ?

Back to top button