डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे डर्टी नेते, संजय राऊतांचा घणाघात | पुढारी

डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे डर्टी नेते, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : पुढारी ऑनलाईन

महिनाभरात महापालिका निवडणुका आहेत. यामुळे ते मनपाच्या शिपायांवरदेखील छापा टाकू शकतात. डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे डर्टी नेते आहेत, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महापालिका निवडणूक असल्याने ते आता शिपयांवरही छापे टाकू शकतात, असेही ते म्हणाले. केंद्रीय यंत्रणांकडून जे छापे टाकण्याचं सत्र सुरू आहे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना जी ईडीकडून अटक करण्यात आलीय, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोत होते.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील आयकर छापा टाकण्यात आलाय. यावर राऊत म्हणाले, महिनाभरात महापालिका निवडणुका असल्याने आयकर विभाग शिपायांच्या घरावरदेखील छापा टाकू शकतात. २०२४ पर्य़ंत आम्हाला हे सहन करायचं आहे. महाराष्ट्रालाही हे सहन करायचं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ट्विट केेले असून ते ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी आज दिल्लीत विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.

Back to top button