छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे रयतेचे राजे : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारे रयतेचे राजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यासारख्‍या   युगपुरुषाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला, हे या भूमीचे आणि भूमीपुत्रांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कष्टकरी, शेतकरी तसेच रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराज यांच्‍याबद्दल प्रेम, अभिमान, आदर, स्वाभिमान हा पिढीगणित वाढत असल्याचे पवार म्हणाले. यावेळी जनतेला संबोधित करत असतानाच काही नागरिकांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा पवार यांनी सांगितले की, पहिल्यांदा ज्या समाजांना आरक्षण दिले आहे, त्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या भूमिकेवर महाविकास आघाडीचे सरकार सहमत आहे.

याप्रसंगी जन्मसोहळा पार पडल्यावर बंदुकीच्या फैऱ्या झाडून शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ढोल-लेझीम पथकांनी कलेचे सादरीकरण केले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती ठाकरे, छत्रपती संभाजी महाराज भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके आदी उपस्थित होते.

पाहा व्‍हिडीओ :

छत्रपती शिवाजी महाराजांचे राजर्षी शाहूंनी बांधलेले कोल्हापुरातील मंदिर…

हेही वाचलंत का ? 

Back to top button