पुणे : बिबवेवाडी येथील गोळीबार प्रकरणातील आरोपींना बेड्या | पुढारी

पुणे : बिबवेवाडी येथील गोळीबार प्रकरणातील आरोपींना बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून बिबवेवाडी परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी फरार झाले होते. फरार कालावधीत आरोपी सिंहगड येथील जंगलात वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दिवसा सिंहगडच्या जंगलात तर रात्री घरी अशा पध्दतीने ते गुन्हा करून मोकाट फिरत होते. त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला; किरीट सोमय्या भाजप नेत्यांसह चौकशीच्या मागणीसाठी थेट दिल्लीत पोहोचले !

सौरभ दत्तू सरवदे (22, रा. पर्वती पायथा, पर्वती), मुन्ना उर्फ अनिस फारूक सय्यद (19), बापु उर्फ आकाश सुरेश शिळीमकर (21) आणि जंब्या उर्फ ऋषिकेश विठ्ठल साळुंखे (21, सर्व रा. जनता वसाहत, पर्वती), आकाश सुरजनाथ सहाणी (24), बाब्या उर्फ अदित्य संजय नलावडे (20, दोघेही रा. पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हिंगणघाट प्राध्‍यापिका जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्‍मठेप

दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जनता वसहात येथे अमित कैलास थोपटे व त्याचा मित्र सुरज झिटे यांची संशयीत आरोपी सौरभ सरवदे व रूपेश सोनवणे यांच्याशी दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून भांडणे झाली होती. याच कारणावरून सौरभ सरवदे व गणेश जगदाळे यांनी 6 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 10 ते 12 साथीदारांच्या मदतीने दुचाकीवर येऊन कोयते, तलवार, लाकडी दांडके, पिस्तुल घेऊन बिवबेवाडी परिसरात आले होते. त्यावेळी कैलास थोपटे, अमोल थोपटे, गणेश मोडावत व इतर चार ते पाच जण गप्पा मारत असताना आलेल्या टोळक्याने त्यांच्या जवळील पिस्तुलातून गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केला.

Karnataka hijab row : तोपर्यंत कर्नाटकात कॉलेजमध्ये धार्मिक पोशाखांवर बंदी : उच्च न्यायालय

आईला भेटायला आला आणि अडकला

या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे त्यांच्या पथकासह तपास करीत होते. दरम्यान, पोलिस अमंलदार सतीश मोे व श्रीकांत कुलकर्णी यांना सौरभ सरवदे हा आईला भेटण्यासाठी घरी येणार असल्याची माहिती मिळाली. याच संधीचा फायदा घेत पोलिसांनी सरवदे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात हा गुन्हा गणेश जगदाळे, मुन्ना सय्यद, आकाश शिळीमकर, जंब्या साळुंखे, आकाश सहाणी, बाळू नलावडे, गौरव बुगे, रोहन लोंढे, रोहित औचरे, अजय आखाडे यांनी मिळून केल्याचे सांगितले.

अमरावती : आयुक्तांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आमदार रवी राणांसह १० जणांवर गुन्हा दाखल

त्यानंतर सय्यद, शिळीमकर, साळुंखे, सहाणी, नलावडे यांना अटक करण्यात आली. त्यांना 14 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, अमंलदार शाम लोहोमकर, गणेश दुधाणे, अमित पुजारी, तानाजी सागर यांनी ही कारवाई केली.

Back to top button