India Vs West Indies : शाहरुख खान, आर साई किशोर यांची टीम इंडियात एन्ट्री | पुढारी

India Vs West Indies : शाहरुख खान, आर साई किशोर यांची टीम इंडियात एन्ट्री

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारताचा उद्योन्मुख खेळाडू अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानसाठी ( shahrukh khan ) टीम इंडियाची दारे उघडले गेली आहेत. अखेर शाहरुखच्या कामगिरीची दखल घेत भारतीय निवड समितीने शाहरुख खान संधी देण्याचा निर्णय घेतला. भारतात खेळल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या ( India Vs West Indies )  मालिकेसाठी शाहरुख खानला संघात राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.

देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेत शाहरुख खान सातत्याने चांगली कामिगिरी बजावत निवड समितीचे लक्ष वेधून घेत होता. विशेष म्हणजे टी-२० प्रकारात आक्रमक फलंदाजी करत तो भविष्यातील आपली दावेदारी सिद्ध करु पहात होता. सैय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेत त्यांने अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपल्या संघास विजयी केले होते. शिवाय विजय हजारे चषक स्पर्धेत देखिल त्याने कामगिरीत सातत्य ठेवले. मागील आयपीएलच्या सत्रात देखिल त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. ( India Vs West Indies )

शाहरुख खानसोबत फिरकीपटू आर. साई किशोर ( Ravisrinivasan Sai Kishore ) याने  भारतीय संघात स्थान पटकावले आहे. मागील वर्षी  श्रीलंकेत मालिका खेळण्यास पाठविण्यात आलेल्या भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून साई किशोर याला समावेश होता. त्याला दुसऱ्यांदा भारतीय संघासोबत ( India Vs West Indies )  राहण्याची संधी मिळाली आहे. यावेळी राखीव खेळाडूमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

कोरानाचा प्रभाव पाहता मुख्य संघातील एखादा खेळाडू जखमी अथवा कोरोना पॉझिटिव्ह आल्यास खरबरदारीचा उपाय म्हणून संघ शाहरुख खान आणि साई किशोरचा विचार करेल. कोरानाच्या पार्श्वभूमीवर का असेना पण, शाहरुख आणि साई किशोरच्या कामगिरीची दखल निवड समितीने घेतली आहे.

Back to top button