Dharmendra Pratap : देशातील सर्वांत उंच व्यक्तीचा ‘सपा’मध्ये प्रवेश | पुढारी

Dharmendra Pratap : देशातील सर्वांत उंच व्यक्तीचा 'सपा'मध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचार वेगात सुरू आहे. प्रत्येक पार्टी आणि त्यांची लोकप्रियता वाढविण्यासाठी एकही संधी सोडताना दिसत नाहीत. असाच एक प्रकार शनिवारी दिसून आला. देशातील सर्वांत उंच व्यक्तीने समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. खुद्द माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंह (Dharmendra Pratap) यांच्याबरोबर दिसले आहेत.

समाजवादी पार्टीकडून असं सांगण्यात आलं आहे की, “पार्टीची धोरणं आणि अखिलेख यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे प्रतापगड येथील धर्मेंद्र प्रताप सिंह यांना समाजवादी पार्टीचे सदस्यत्व देण्यात आले आहे.” यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल म्हणाले की, “धर्मेंद्र प्रताप सिंह (Dharmendra Pratap) पार्टीत आल्यामुळे पार्टी आणखी मजबूत होईल.”

Dhamendra Pratap

धर्मेंद्र प्रताप सिंह हे ४६ वर्षांचे असून ते भारतातील सर्वांत उंच व्यक्ती आहेत. त्यांची उंची ८ फूट २ इंच इतकी आहे. त्यांच्या पार्टी प्रवेशावेळी प्रतापगडचे सौरभ सिंहदेखील उपस्थित होते. धर्मेंद्र प्रताप यांची लांबी २.४ मीटर इतकी आहे. जगातील सर्वांत उंच असणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत ते ११ सेंटीमीटरने कमी आहे.

धर्मेंद्र प्रताप हे उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील आहेत. त्यांची उंची जास्त असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागलो. एका मुलाखतीत धर्मेंद्र प्रताप यांनी सांगितलं होतं की, “उंची जास्त असल्यामुळे त्यांना नोकरी आणि जोडीदार शोधताना त्रास होत आहे. त्यामुळे मनोरंजन पार्कमध्ये एक कलाकार म्हणून काम करतो आहे.”

धमेंद्र प्रताप यांच्याबरोबर लोक फोटो काढतात आणि त्यांना त्याचे १० देत असतात. त्यांना सहजपणे चालताना त्रास होतो. त्यांच्या कुटुंबामध्ये जास्त उंची असलेल्या व्यक्ती नाहीत. फक्त त्यांच्या आजोबांची उंची जास्त आहे. त्यांची उंची ७ फूट ३ इंच इतकी आहे. त्यांच्या उंचीमुळे लोक त्यांना उंट आणि जिराफदेखील म्हणतात.

Back to top button