न्यूयॉर्क : ब्रेन डेड व्यक्‍तीच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण | पुढारी

न्यूयॉर्क : ब्रेन डेड व्यक्‍तीच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण

न्यूयॉर्क : अलीकडेच अमेरिकेत एका व्यक्‍तीच्या शरीरात डुकराच्या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले होते. आता अमेरिकेतीलच डॉक्टरांनी एका ब्रेन डेड व्यक्‍तीच्या शरीरात डुकराच्या किडनी म्हणजेच मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण केले आहे. या दोन्ही किडनी ‘जेनेटिकली मॉडिफाईड’ म्हणजेच जनुकीयद‍ृष्ट्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

ब्रेन www.pudhari.news

जिम पार्सन्स नावाच्या 57 वर्षांच्या व्यक्‍तीच्या शरीरात या किडनींचे प्रत्यारोपण करण्यात आले. गेल्यावर्षी एका अपघातात तो गंभीर जखमी झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड’ घोषित केले होते. डॉक्टरांनी त्याच्या नातेवाईकांची संमती घेऊन आता ही शस्त्रक्रिया केली आहे. त्याच्या शरीरात प्रत्यारोपित केलेल्या जेनेटिकली मॉडिफाईड डुकराच्या किडनी योग्यप्रकारे काम करीत आहेत.

या मूत्रपिंडांनी मूत्राचा प्रवास योग्यप्रकारे प्रवाहित केला आहे. ‘अमेरिकन जर्नल ऑफ ट्रान्सप्लँटेशन’मध्ये 20 जानेवारीला याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. हे प्रत्यारोपण करणार्‍या डॉक्टरांच्या टीममधील एका तज्ज्ञाने सांगितले ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी ठरली आहे. ब्रेन डेड व्यक्‍तीच्या शरीराने या मूत्रपिंडांना स्वीकारलेले आहे. या प्रयोगातून भविष्यातील संशोधनांचा व प्रत्यारोपणांचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

हेही वाचलतंं का? 

Back to top button