बीड : केज तालुक्यात पारधी समाजातील ६० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून | पुढारी

बीड : केज तालुक्यात पारधी समाजातील ६० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून

केज; पुढारी वृत्‍तसेवा

केज तालुक्यातील नांदूरघाट जवळील हंगेवाडी येथे पारधी समाजातील एका (६० वर्षीय) महिलेचेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. खुनाचा तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे घटनास्‍थळी पोहोचले आहेत. खुन्याचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात येत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील नांदूरघाट येथून जवळच असलेल्या हंगेवाडी येथे सखुबाई बन्सी शिंदे या पारधी समाजातील महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे घटनास्थळी पोहोचले.

त्या ठिकाणी संशयित मारेकऱ्यांची काही वस्तू असल्याचा संशय असून, अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले आहे. थोड्या वेळात श्वानपथक घटनास्थळी पोहोचत आहे. पोलीस पथकातील कर्मचारी मेसे, भालेराव, शिवाजी शिनगारे, मतीन शेख हे तपास करीत आहेत.

Back to top button