मध्यरात्री पुजाऱ्याच्या खोलीला बाहेरुन कडी लावून चोरट्यांनी फोडली मंदिराची दानपेटी ; हजारोंची रोकड लंपास | पुढारी

मध्यरात्री पुजाऱ्याच्या खोलीला बाहेरुन कडी लावून चोरट्यांनी फोडली मंदिराची दानपेटी ; हजारोंची रोकड लंपास

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील गावाबाहेरील देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून हजारो रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंदिरातील पुजारी नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी मंदिराला कुलूप लावत असतात. गुरुवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून भक्तनिवासमध्ये झोपलेल्या पुजारी यांच्या खोलीला बाहेरून कडी लावून घेत हत्याराच्या साह्याने दानपेटी फोडली.

दानपेटीत अंदाजे आठ ते दहा हजार रुपयांची चिल्लर व काही नोटा असल्याचे पुजारी यांनी सांगितले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक चेतन मोरे करत आहेत.

हेही वाचा ;

Back to top button