Unhappy Leave : ‘ऑफिस मूड’ नसेल तर मिळणार ‘अनहॅप्पी लिव्ह’! | पुढारी

Unhappy Leave : ‘ऑफिस मूड’ नसेल तर मिळणार ‘अनहॅप्पी लिव्ह’!

हेनान : असे अनेकदा होते की, ऑफिसला जाण्याची वेळ येऊन ठेपली तरी घरातून पाय बाहेर निघत नाही. Unhappy Leave ऑफिसला जाण्याचा कंटाळा वाटतो आणि सुट्टी घेतली असती तर बरे झाले असते, असेही वाटून जाते. कर्मचार्‍यांची हीच मानसिकता ओळखून चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना दरवर्षी चक्क 10 अनहॅप्पी लिव्ह देण्याची अनोखी घोषणा केली आहे.

ज्या दिवशी ऑफिसला येण्याचा मूड नसेल, अशावेळी कर्मचार्‍यांनी ही रजा वापरावी, Unhappy Leave असे या कंपनीने म्हटले आहे. एखादा कर्मचारी ऑफिसमध्ये येण्यासाठी मनापासून तयारच नसेल तर तो मनापासून काम तरी कसे करणार, हे ओळखून आम्ही हा निर्णय घेतला, असे या कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.

मध्य चीनच्या हेनान प्रांतातील ‘पँग डोंग लाई’ या रिटेल कंपनीने हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या कंपनीचे संस्थापक अध्यक्षांनी कर्मचार्‍यांसाठी अनहॅप्पी लिव्हची Unhappy Leave घोषणा चायना सुपरमार्केट वीकमध्ये केली आणि तातडीने याची अंमलबजावणी करत असल्याचेही जाहीर केले आहे.

एरवी कार्यालयीन कर्मचार्‍यांना हक्काच्या रजा, आजारी रजा, किरकोळ रजा अशा अनेक प्रकारच्या रजा मिळत असतात. अलीकडेच भारतातील एका कंपनीने ब्रेकअप लिव्ह Unhappy Leave देखील जाहीर केली. पण, चीनमधील कंपनीने त्यापुढेही जात ‘अनहॅप्पी लिव्ह’ची नवी संकल्पना समोर आणत त्याची रीतसर अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.

Back to top button