चीनमध्ये सर्वात वेगवान इंटरनेट सेवा | पुढारी

चीनमध्ये सर्वात वेगवान इंटरनेट सेवा

बीजिंग : एकेकाळी ‘इंटरनेट’ म्हणजे काय, हे लोकांना ठाऊकही नव्हते. आता इंटरनेटशिवाय दैनंदिन जीवनातील पाऊल पुढे पडत नाही! इंटरनेट जितके वेगवान, तितके आपले कामही जलद होऊ शकते. चीनने आता जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा देऊ केली आहे. हा क्लाऊड ब्रॉडबँड आहे, जो रॉकेटसारखा वेग देईल. चीनचा दावा आहे की, क्लाऊड ब्रॉडबँड तंत्रज्ञानाच्या मदतीने ते 1 मिनिटात सुमारे 908 k चित्रपट डाऊनलोड करू शकेल. या नवीन सेवेला ‘F5 G- A’ असे नाव देण्यात आले आहे. जाणून घेऊया, या फास्टेस्ट इंटरनेट सर्व्हिसविषयी.

जगातील पहिला 10 G क्लाऊड ब्रॉडबँड कम्युनिटी शांघायमध्ये लाँच करण्यात आला आहे, जो 50 G-PON तंत्रज्ञानाद्वारे सपोर्टेड आहे. हा उपक्रम चायना टेलिकॉम, शांघाय कंपनी आणि यांगपू डिस्ट्रिक्ट गव्हर्न्मेंट यांच्यातील भागीदारी आहे. यांच्यात मुळात लाईटिंग फास्ट इंटरनेट स्पीड देण्यात आला आहे, ज्यामुळे उत्तम डिजिटल अनुभव येईल. यामध्ये युजर्सना 10 गीगाबाईट क्लाऊड ब्रॉडबँडचा अनुभव दिला जाईल. कंपनीचा दावा आहे की, या स्पीडने 8 ज्ञ व्हिडीओ क्वॉलिटीसह 2 तासांचा 90 GB चित्रपट 72 सेकंदांत डाऊनलोड केला जाऊ शकतो. हा नवा जागतिक विक्रम आहे.

नवीन तंत्रज्ञानामुळे तुमची काम करण्याची पद्धत बदलेल, असा दावा केला जात आहे. यामध्ये तुम्हाला अल्ट्रा फास्ट ब्रॉडबँड स्पीड मिळेल, ज्यामुळे ऑनलाईन काम करणे सोपे होईल. चीनचे अल्ट्रा फास्ट डेटा ट्रान्सफर तंत्रज्ञान स्मार्ट होम तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करेल. हे तंत्रज्ञान रिअल-टाईम डेटा प्रोसेसिंग, लॅग फ्री कम्युनिकेशनसह 10 G नेटवर्क प्रदान करते. या स्पीडमुळे जे युजर्स जास्त डेटा ऑनलाईन ट्रान्सफर करतात, त्यांना सर्वाधिक फायदा मिळेल. याचा अर्थ कन्टेन्ट प्रोड्युस करणे आणि व्हिडीओ ट्रान्सफर करणे सोपे होईल. याशिवाय सामान्य युजर्सनाही मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.

Back to top button