घराच्या परसात सापडली एक हजार वर्षांपूर्वीची तलवार | पुढारी

घराच्या परसात सापडली एक हजार वर्षांपूर्वीची तलवार

लंडन : दक्षिण फिनलंडमध्ये एका गृहस्थाला आपल्या घराच्या परसात काही काम करीत असताना खोदकामावेळी चिखलात माखलेली एक लोखंडी वस्तू आढळली. त्याने ही वस्तू ओढून बाहेर काढली व स्वच्छ करून पाहिली असता ती एक जुनी तलवार असल्याचे दिसून आले. संशोधकांनी आता या तलवारीचा अभ्यास करून म्हटले आहे की ती तब्बल एक हजार वर्षांपूर्वीची आहे!

ही तलवार सापडताच या गृहस्थाने तत्काळ स्थानिक पुरातत्त्व संशोधकांशी संपर्क साधून तलवारीची माहिती दिली होती. ही तलवार काहीशी वाकली आहे. युद्धावेळी स्विडीश योद्धे अशा तलवारींचा वापर करीत असत. या तलवारीची रेडिओ कार्बन चाचणी घेतली असता ती इसवी सन 1050 आणि 1150 या काळातील असल्याचे स्पष्ट झाले. बाराव्या व तेराव्या शतकानमध्ये स्विडीश योद्धे फिनलंडवर ताबा घेण्यासाठी अनेक हल्ले करीत होते. जुहा रुहोनेन यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या तलवारीवर धार्मिक मजकूरही कोरलेला आहे.

Back to top button