46 वर्षांनी मोठा जोडीदार! | पुढारी

46 वर्षांनी मोठा जोडीदार!

वॉशिंग्टन : कोणतीही युवती असो, तिच्यासाठी तिच्या स्वप्नातील राजकुमार तब्बल 46 वर्षांनी मोठा अजिबात असू शकत नाही. पण, प्रेम आंधळे असते, असे का म्हणतात, याची प्रचिती एका अनोख्या जोडप्याने दिली. यात एका 23 वर्षीय युवतीने आपल्यापेक्षा 46 वर्षांनी मोठ्या असलेल्या, चक्क 70 वर्षीय व्यक्तीला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

एरिका मोजर असे या युवतीचे नाव असून तिने 70 वर्षांच्या रिक साईकला आपला जोडीदार म्हणून पसंती दिली. हे दोघेही मागील दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी विवाहाचा देखील निर्णय घेतला होता.

23 वर्षीय एरिका सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर असून ती अमेरिकेत राहते. एका डेटिंग शोवर तिची रिक यांच्याशी ओळख झाली. वास्तविक, रिक तिच्यासाठी वडिलांच्या वयाचे होते. पण, तरीही ती त्यांच्या प्रेमात कशी पडली, हे तिलाच कळाले नाही. या उभयतांची पहिली ओळख मॅरिंग मिलियन्स या अनोख्या शोमध्ये झाली होती. पण, नंतर मात्र तिला आपली चूक उमगली आणि तिने आपण काही काळ भरकटल्याचे कबूल केले. सध्या तिने आपल्या विवाहाचा इरादा सपशेल बदलला असून यापूर्वीप्रमाणेच इन्फ्ल्यूएन्सर म्हणून कार्यरत राहणार असल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या
Back to top button