ड्रग्जला परवानगी देऊ इच्छिणारा आग्रही देश! | पुढारी

ड्रग्जला परवानगी देऊ इच्छिणारा आग्रही देश!

लंडन : स्कॉटलंड सरकारने अमली पदार्थांच्या सेवनाने होणार्‍या मृत्यूंची समस्या निकालात काढण्यासाठी अमली पदार्थ आपल्याकडे ठेवण्याला अपराधाच्या श्रेणीतून बाहेर करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. सध्या ब्रिटिश सरकारने याला विरोध दर्शवला असून अमली पदार्थाशी संबंधित कोणताही कायदा शिथिल करण्याचा आपला विचार नसल्याचे स्पष्ट केले. स्कॉटलंडचे सरकार मात्र या अभिनव मागणीसाठी अद्याप आग्रही आहे.

स्वातंत्र्याचे समर्थन करत आलेल्या स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या नेतृत्वाखालील एडिनबर्ग सरकारने अमली पदार्थांना अपराधाच्या श्रेणीतून बाहेर ठेवले तर यामुळे बराच फरक पडू शकेल. सध्या अमली पदार्थांच्या अति सेवनामुळे युरोपमध्येच सर्वाधिक मृत्यू होतात. ब्रिटनच्या तुलनेत स्कॉटलंडमधील प्रमाण चक्क तिप्पट आहे, यावरूनच बरेच काही स्पष्ट होते.

स्कॉटलंड हा युनायटेड किंगडमचा एक भाग असून ग्रेट ब्रिटनच्या उत्तरेकडे स्थित आहे. याचे एकूण क्षेत्रफळ 78850 चौरस किमी असून एडिनबर्ग ही त्याची राजधानी आहे. ग्लास्गोला देशातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते. स्कॉटलंडचे चलन ब्रिटिश पौंडापेक्षा किंचीत वेगळे आहे. त्याचे मूल्य मात्र समसमानच आहे.

Back to top button