Black carrots : काळी गाजरंही असतात आरोग्यासाठी गुणकारी! | पुढारी

Black carrots : काळी गाजरंही असतात आरोग्यासाठी गुणकारी!

नवी दिल्ली : शीर्षक वाचताच पहिला प्रश्न आपल्या मनात आला असेल की ‘काळी गाजरंही (Black carrots) असतात?’ तर याचे उत्तर आहे ‘होय’! द्राक्षे जशी हिरवी आणि काळी दोन्ही रंगांची असतात तसाच हा प्रकार आहे. लाल रंगांची द्राक्षे तर अतिशय महाग असतात व जपानमध्ये या द्राक्ष्यांना मोठीच किंमत मिळत असते. गाजरांमध्येही अशी विविधता असते याची आपल्याला कल्पना नसते. आपण सहसा नारंगी किंवा लाल रंगाचीच गाजरे पाहतो. मात्र जांभळी, काळी, पिवळी आणि पांढरी गाजरंही असतात. त्यापैकी काळी गाजरंही आरोग्यासाठी लाभदायक असतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अशा काळ्या गाजरांमध्ये (Black carrots) फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, ब्लोटिंग, फ्लाटुलेन्ससारख्या पचनाशी संबंधित समस्यांवर ती गुणकारी ठरतात. काळ्या गाजरांमुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यामध्ये अँथोसायनिन्स असतात व त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढत नाहीत. तसेच शरीरात सूज येण्याची समस्याही कमी होते.

काळ्या गाजरांमध्ये (Black carrots) असलेली अँटिऑक्सिडंटस् हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी असतात. त्यांच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी होण्याची समस्या दूर होते. तसेच रक्तातील प्लेटलेटस्चे कामही सुरळीत होते. वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही अशी गाजरं उपयुक्त ठरतात. लाल गाजरांप्रमाणेच अशी काळी गाजरंही डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. या गाजरांमुळे डोळ्यांमधील रक्तप्रवाहही सुरळीत राहतो.

हेही वाचा : 

Back to top button