त्या पठ्ठ्याची मगरीसंगे डबलसीट रे लांब लांब लांब…, ‘मगर राइड’ Viral Video (पाहा व्हिडिओ) | पुढारी

त्या पठ्ठ्याची मगरीसंगे डबलसीट रे लांब लांब लांब..., 'मगर राइड' Viral Video (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाइन डेस्क : मगर या प्राण्याचे नाव घेतले तरी भल्याभल्यांना धडकी भरते. पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओत एका तरुणाने चक्क एक मगर आपल्या बाइक वर बांधून त्यावर बसून बाइक राइड करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Viral Video

व्हिडिओबाबत असेही म्हटले जात आहे की, हा व्हि़डिओ खराखुरा नसून एडिटेड आहे. किंवा काहींनी मगर नकली असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये या युवकाने अगदी बिनधास्तपणे मगरीला आपल्या बाईकवर बांधून टाकले आहे. हे मगर पूर्ण वाढ झालेले असल्याने त्याचे शेपूट जमीनीवर लोळत आहे. नंतर हा मुलगा या मगरीवर सवार झाला आणि अगदी आरामात बाइक चालवत आहे. Viral Video

इंन्स्टाग्रामवर oy._.starrr नावाच्या पेजद्वारा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओत दिसणारा हा मुलगा नेमका कोण आहे, हा व्हिडिओ कोणत्या स्थानाचा आहे, याची माहिती उपलब्ध नाही. पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला लाखो व्यूव आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत एक लाख 41 हजार लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. Viral Video

व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे. आम्ही किती क्रूर झालो आहो. तर आणखी एकाने लिहिले आहे हे खूप भयावह आहे. तर एकाने म्हटले आहे. चला कोणाला तरी मगरीला बाईकवरून फिरवण्याची हौस आहे. तर काही जणांची माणसाच्या अशा प्रवृत्तसाठी अगदी शिव्यांची लाखोली देखील वाहिली आहे. तर काहींनी रागीट, रडकी, उदास अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले आहे. Viral Video

 

View this post on Instagram

 

A post shared by @oy._.starrr

हे ही वाचा :

अभी तो पार्टी शुरू हुई है..!

आंबोलीत साकारणार वन्यजीव पर्यटन

Back to top button