World record : दाढीत सर्वाधिक रंगीत गोळे लावण्याचा विश्वविक्रम | पुढारी

World record : दाढीत सर्वाधिक रंगीत गोळे लावण्याचा विश्वविक्रम

वॉशिंग्टन : ख्रिसमसच्या सजावटीमध्ये ख्रिसमस ट्रीची (World record) सजावट खासच असते. या झाडाला सजवण्यासाठी अनेक रंगीबेरंगी चेंडूंचा म्हणजेच बबल्सचा वापर केला जात असतो. आता अमेरिकेत राहणार्‍या एका व्यक्तीने दाढीच्या मदतीने याबाबतचा एक विश्वविक्रम केला आहे. जॉस स्ट्रैसर नावाच्या व्यक्तीने त्याच्या दाढीमध्ये तब्बल 710 ख्रिसमस बबल्स लावून एक नवा इतिहास रचला आहे.

सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जॉसने सुट्ट्यांच्या काळात दाढीमध्ये बबल्स लावण्याचा प्रकार केला आहे. शिवाय त्याने लोकांना विश्वास बसावा म्हणून या सर्व घटनेचे व्हिडीओ शूटिंगही केले आहे. (World record) त्या व्हिडीओमध्ये तो दाढीला बबल्स लावताना दिसत असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबाबतच्या विक्रमाची नोंद गिनिज बुकमध्ये (World record) झाली असून त्याचा व्हिडीओ गिनिजच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जॉस स्ट्रैसरने आपल्या दाढीमध्ये सर्वाधिक बबल्स लावले आहेत. अशी कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button