लाल ग्रहावर आहे बर्फाच्छादित विवर | पुढारी

लाल ग्रहावर आहे बर्फाच्छादित विवर

वॉशिंग्टन : मंगळावर एक चकीत करणारे ठिकाण अस्तित्वात आहे. ही ठिकाण म्हणजे ‘कोरोलेव क्रेटर’ होय. ते अत्यंत सुंदर डागासारखे दिसते. हे एक विवर असून ते दोन कि.मी. खोल तसेच 82 कि.मी. इतके रूंद आहे. कलर अँड स्टिरिओ इमेजिंग सिस्टीमने आर्बिटरच्या मदतीने हे छायाचित्र पाठविले आहे.

हे छायाचित्र ‘मार्स एक्स्प्रेस हाई रेजोल्यूशन स्टिरिओ’ कॅमेर्‍याने टिपले आहे. या छायाचित्रात पाच वेगवेगळ्या स्ट्रिप्स सहभागी आहेत. या सर्वांना मिळून एक छायाचित्र तयार करण्यात आले आहे. छायाचित्रात दिसत असणारे ‘कोरोलेव क्रेटर’ हे मंगळाच्या उत्तर भागात असून ते दोन कि.मी. खोल व 82 कि.मी. रूंद आहे. मंगळावरील हे एक असे एक विवर आहे की, तेथे ते अत्यंत सुरक्षित आहे. तसेच ते पूर्णपणे बर्फाने भरलेले आहे. या विवरातील या बर्फाची जाडी सुमारे 1.8 कि.मी. आहे.

‘कोरोलेव क्रेटर’ हा नेहमीच बर्फाने भरलेला असतो. म्हणूनच त्याला ‘कोल्ड ट्रॅप’ म्हणूनही ओळखले जाते. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास क्रेटरचा हा भाग पूर्णपणे बर्फाच्छादित आहे. याशिवाय येथील प्राकृतिक रचनेमुळे हा बर्फ वितळत नाही. यामुळे तो नेहमीच स्थिर असतो. या खड्ड्याचे नाव प्रमुख रॉकेट इंजिनिअर व अंतराळ यान डिझाईनर सर्गेई कोरोलेव यांच्या नावे ठेवण्यात आले आहे. त्यांना सोव्हिएत ‘स्पेस टेक्नॉलॉजी’चे जनक म्हणूनही ओळखले जाते. या क्रेटरच्या मदतीने मंगळाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास मदत मिळते.

Back to top button