टोकियो : उष्ण पाण्याचे स्नान बनवते दीर्घायुषी! | पुढारी

टोकियो : उष्ण पाण्याचे स्नान बनवते दीर्घायुषी!

टोकियो : दीर्घायुष्यामागे अनेक कारणे असू शकतात. जपानमधील लोक दीर्घायुषी असतात. या लोकांचे सरासरी वय 84.6 वर्षे आहे. महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात. महिलांचे सरासरी वय 87.45 वर्षे तर पुरुषांचे वय 81.41 वर्षे आहे. भारतात महिलांचे सरासरी वय 71.2 व पुरुषांचे 68.46 वर्षे आहे.

निवृत्त झाल्यानंतर जपानींची शारीरिक क्षमता इतरांपेक्षा चांगली असते. जपानी लोक दीर्घकाळ का जगतात? टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर शिन्या हयासाका यांनी त्याचे उत्तर शोधले आहे. या संशोधनानुसार लोकांचे दीर्घायूचे रहस्य त्यांच्या गरम पाण्याच्या स्नानात दडले आहे.

जगात केवळ 40 टक्के लोक रोज स्नान करतात. 80 टक्के जपानी दररोज स्नान करतात. ते गरम पाण्याच्या झर्‍याला प्राधान्य देतात. शिन्याने चिबा विद्यापीठातील संशोधकांच्या मदतीने 3 वर्षांहून जास्त वयाच्या 14 हजार जपानी लोकांचे संशोधन केले. दररोज गरम पाण्याने स्नान करणार्‍यांना आठवड्यातून दोन किंवा त्यापेक्षा कमीवेळा गरम पाण्याने स्नान करणार्‍यांच्या तुलनेत नर्सिंगची गरज 30 टक्के कमी भासते, असा निष्कर्ष यातून निघाला.

स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोकाही 30 टक्के कमी होतो. प्रो. शिन्या व त्यांच्या टीमने तीन दशकांपासून गरम पाण्याच्या झर्‍याखाली स्नान करण्याचे लाभ जाणून घेतले. एक वृद्ध गरम पाण्याने स्नान करतो. त्यामुळे त्याचा रक्तदाब वाढतो तसेच नंतर कमी होत असल्याची माहिती एका परिचारिकेने दिली होती. जपानमध्ये सुमारे 27 हजार उष्ण पाण्याचे झरे आहेत.

धार्मिकस्थळी स्नानगृह असायचे. शिन्या म्हणाल्या, 1960 पर्यंत प्रत्येक घरात स्नानघर नव्हते. गल्लीत सार्वजनिक स्नानगृहाची व्यवस्था होती. आता घरात स्नानगृह असतानाही शेकडो सार्वजनिक स्नानगृहेही दिसून येतात .

Back to top button