खमंग वासानेही मेंदू होतो सक्रिय! | पुढारी

खमंग वासानेही मेंदू होतो सक्रिय!

वॉशिंग्टन : खमंग वासाचा दरवळ येत असताना त्याच्याबरोबर तरंगत जाणार्‍या टॉम किंवा जेरीचे कार्टून आपण पाहतो. अर्थात हे कार्टूनमध्ये किंवा प्राण्यांबाबतच घडते असे नाही. माणसाचा मेंदूही भोजनाच्या गंधाने असाच सक्रिय होत असतो. अलीकडेच याबाबतच्या नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

जेवणाचा सुगंध येताच आपल्या काही विशिष्ट आठवणी अगदी ताज्या होतात. या आठवणींची जाणीव दीर्घकाळ आपल्या मनात असते. खाद्यपदार्थांच्या सुगंधामुळे अगदी वृद्धांचा मेंदूही सक्रिय होतो व ते भूतकाळात जातात. याबाबतच्या प्रयोगासाठी संशोधकांनी पदार्थांचे लहान लहान गोळे बनवले. प्रयोगात सहभागी झालेल्या वृद्धांकडे हे लहान गोळे नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

या आठवणी लेनचेस्टर विद्यापीठातील प्रा. कोरिना सास व डॉ. टॉम गेलर यांनी थ्री-डी प्रिंटेड फ्लेवर यावर आधारित संकेतांच्या सहाय्याने नोंदवल्या. त्यानुसार 12 वृद्धांच्या 72 आठवणींतील जुन्या जाणिवांना उजाळा मिळाला. सोबत त्यावेळेच्या घटनाही त्यांना आठवल्या. विस्मरणाचा आजार असल्यास सुगंध उपयोगी ठरू शकतो असेही यामधून दिसून आले.

Back to top button