कसा बनला होता हिमालय? | पुढारी

कसा बनला होता हिमालय?

नवी दिल्ली : ‘स्थावराणां हिमालयः’ असे म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेत हिमालय ही आपली एक विभुती असल्याचे म्हटले आहे. कालिदासाने या ‘नगाधिराजा’ला पृथ्वीचा मानदंड मानले. जगातील सर्वात उंच दहा पर्वतशिखरे हिमालयातच आहेत. हिमालयाच्या गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून अनेक साधू-संतांनी तपश्चर्या केली आहे. भारताचे उत्तर बाजूने रक्षण करणारा हा पर्वतराज लाखो वर्षांपूर्वी बनलेला आहे.

असे मानले जाते की पृथ्वीवर एकेकाळी ‘पेंजिया’ नावाचा एकच खंड होता आणि ‘पेंथालासा’ नावाचा एकच महासागर होता. मात्र, हळूहळू भूगर्भातील हालचालींमुळे हे महाद्वीप दोन भागांत विभाजीत होऊन उत्तरेत अंगारालँड व दक्षिणेत गोंडवानालँड या नावाने निर्माण झाला. या दोन्हीच्या दरम्यान टेथिस नावाचा समुद्र निर्माण झाला. भूगर्भातील हालचालींमुळे गोंडवानालँडपासून अनेक भूखंड वेगळे झाले.

अशा काळातच भारतीय भूमीचा भूखंडही गोंडवानालँडपासून वेगळा होऊन सरकू लागला. सुमारे 13.5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय भूखंड आणि युरेशियाच्या प्लेटस् एकमेकींना धडकल्या आणि टेथिस सागराच्या आतील दगड, मातीपासून हिमालयाची निर्मिती झाली. कर्करेषेच्या वर असल्याने हिमालय अतिशय थंड आहे आणि याठिकाणी नेहमी हिमाच्छादीत शिखरे दिसतात. समुद्र सपाटीपासून त्याची उंची 8 हजार मीटर आहे. इतक्या उंचीवर ऑक्सिजनची पातळी कमी होते.

संबंधित बातम्या
Back to top button