हवामान बदलामुळे माणूस बनत जाणार खुजा | पुढारी

हवामान बदलामुळे माणूस बनत जाणार खुजा

लंडन : हवामान बदल, जागतिक तापमानवाढ याचे अनेक दुष्परिणाम समोर येत असतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की जसजसे पृथ्वीचे तापमान वाढेल, तसे माणसांचा आकारही लहान होत जाईल. उष्ण हवामानाशी जुळवून घेण्यासाठी माणूस असा खुजा बनत जाईल. भविष्यात माणसाची उंची सरासरी 3.5 फुटांपर्यंतची असू शकते, असे बि—टिश संशोधकांना वाटते.

एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. विद्यापीठातील जीवाश्म वैज्ञानिक स्टीव्ह ब—ुसेट यांनी म्हटले आहे की हवामान बदलाच्या स्थितीत जिवंत राहण्याच्या उत्तम संधीसाठी माणूस आकसून जाईल. घोड्यांच्या प्रजातीचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की 50 कोटी वर्षांपूर्वीच्या पॅलियोसिन काळाच्या तुलनेत घोड्यांच्या उंचीत बरीच घट झालेली आहे. ब—ुसेट यांनी या संशोधनावर आधारित ‘द राईज अँड रीगन ऑफ द मॅमल्स’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की थंड भागातील सस्तन प्राण्यांच्या तुलनेत उष्ण भागातील सस्तन प्राणी लहान आकाराचे असतात. असा लहान आकार त्यांना शरीर थंड ठेवण्यास मदत करू शकतो. ‘होमो फ्लोरेसिएन्सिस’ या मानव प्रजातीचेही उदाहरण त्यांनी दिले आहे. इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटावर ही बुटक्या लोकांची वेगळी मानव प्रजाती अस्तित्वात होती. 50 हजार ते एक लाख वर्षांपूर्वीच्या या माणसांची उंची 3.5 फूट होती.

Back to top button