औरंगाबाद : बीड बायपासवर झालेल्या अपघात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार | पुढारी

औरंगाबाद : बीड बायपासवर झालेल्या अपघात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : बीड बायपास रस्त्यावर हिवाळे लॉन्ससमोर झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्य़ू झाला. प्रमोद दरंदले असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.१५) घडली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, बीड बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. एका ठिकाणी रस्ता अर्धवट झालेला आहे. काही ठिकाणी मातीचा ढिगारा टाकण्यात आलेला आहे. यावेळी प्रमोद दुचाकीवर वेगाने जात असताना त्याला मातीचा ढिगारा दिसला नाही. तो त्यावर धडकला आणि दुभाजकावर आपटला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी घाटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button