Ajit Pawar : ''खोटं नाही सांगत आज माझ्या श्रध्दांजलीचीच सभा होती'' अजित पवारांचा मोठा खुलासा | पुढारी

Ajit Pawar : ''खोटं नाही सांगत आज माझ्या श्रध्दांजलीचीच सभा होती'' अजित पवारांचा मोठा खुलासा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आम्ही लिफ्टने चौथ्या मजल्यावर चाललो होतो. अन् अचानक लाईट गेली. लिफ्ट बंद पडली. त्यानंतर आत घामाघुम झालो. तेवढात लिफ्ट दानकन खाली आदळली, खोटं नाही सांगत आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम होता, अशा शद्बात त्यांच्यावर ओढावलेला बाका प्रसंग बारामतीतील कार्यक्रमात सांगितला.

बारामती येथे एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी पुण्यात लिफ्टमध्ये अडकल्याचा किस्सा सांगितला. मी आणि ९० वर्षीय वयाचे डॉ. हर्डीकर चाललो होतो. ते म्हणाले दादा आता लिफ्टने वर जावू. त्यामुळे आम्ही लिफ्टमध्ये बसलो. काही अधिकारी, सुरक्षारक्षक माझ्यासोबत होते. लिफ्ट बंद झाली. त्यानंतर लाईट गेली. आतमध्ये अंधारमय स्थिती. त्यानंतर ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन धाडकन खाली आली. खोटे नाही सांगत आज श्रध्दांजलीचाच कार्यक्रम होता. सुरक्षा करणाऱ्याना विचारा, त्यांनी दरवाजा तोडला. मला हर्डीकर डॉक्टरांची भिती होती. ही बाब मी पत्नी सुनेत्राही बोललो नाही. आईलाही सांगितली नाही. काल माझ्या वडीलांची पुण्यतिथी होती. मी अभिवादन करायला बारामतीला गेलो होतो. मी माध्यमांनाही सांगितले नाही. अन्यथा ब्रेकींग न्यूजच सुरु झाली असती.

मी सगळ्यांना सांगितले की हे कोणाला बोलू नका. तुम्ही घरची माणसे आहात. मला रहावले नाही म्हणून तुम्हाला सांगत आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे आपण आपली काळजी घेतली पाहिजे. नशिबाची कृपा, परमेश्वराची साथ, तुमचे सगळ्यांच आशीर्वाद त्यामुळे चौथ्या मजल्यावरुन धाडकन लिफ्ट आदळणे, ही परिस्थिती अवघड होती. माझ्यासोबत इतरांना बाहेर काढण्याचे काम यावेळी केले. यात इतरांना थोडेसे लागले सुद्धा असे यावेळी अजित पवार यांनी.

हेही वाचा

Back to top button