Ind vs Sl : ‘वनडे क्रिकेट मरत आहे का?’ मैदानावरुन युवराज सिंगने व्यक्त केली चिंता | पुढारी

Ind vs Sl : ‘वनडे क्रिकेट मरत आहे का?’ मैदानावरुन युवराज सिंगने व्यक्त केली चिंता

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सध्याच्या युगात उदयोन्मुख T20 क्रिकेटने क्रीडा जगत झपाट्याने बदलत चालले आहे. टी-20 सामन्यादरम्यान, सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने पोहोचतात. T20 क्रिकेट हा जगभरात लोकप्रिय खेळ बनला आहे. क्रिकेट प्रेमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाकडे आकर्षित होत आहेत. हे पाहता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (yuvraj singh) वनडेबाबत चिंता व्यक्त केली आहे. (Ind vs Sl)

अनेक देशांमध्ये सुरू झालेल्या T20 लीग आणि फ्रँचायझी क्रिकेटमुळे T20 इतका लोकप्रिय झाला आहे, की एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रेक्षकांचा रस कमी झाल्याचे दिसून येत आहे. कदाचित यामुळेच एकदिवसीय स्वरूपाची लोकप्रियता कमी होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या मनात याच प्रश्नाने चिंता वाढवली आहे. (Ind vs Sl)

युवराज सिंगने व्यक्त केली चिंता (Ind vs Sl)

तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडेदरम्यान रिकामे ग्रीनफिल्ड स्टेडियम पाहून युवराज सिंगने चिंता व्यक्त केली. त्याने ट्विट करून म्हणाल की, “एकदिवसीय क्रिकेट मरत आहे का? लोकांना हे कमी आवडायला लागले आहे का? त्याचवेळी इरफान पठाणने युवराजच्या ट्वीटला उत्तर दिले की, ‘भाई पॅड घाला, पब्लिक येईल’.

विराटची विक्रमी खेळी (virat kohli)

दरम्यान, श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात प्रेक्षक कमी आल्याने युवराज सिंगने चिंता व्यक्त केली असली तरी जितके प्रेक्षक मैदानावर आले त्यांचे विराट कोहलीने आपल्या खेळीने भरपूर मनोरंजन केले. या खेळीत विराटने विक्रमांचा पाऊस पाडला. या सामन्यात भारताने ५ गडी गामवत तब्बल ३९० धावा झळकावल्या. यामध्ये विराट कोहलीने ११० चेंडूत १६६ धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान या खेळती त्याने मागील चार वनडे मध्ये तीन शतक झळकावले. श्रीलंके विरुद्ध तब्बल १० शतक झळकावत सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डला मागे टाकले. शिवाय ४६ वे शतक झळकावत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. आता तो सचिनच्या सर्वाधिक शतके बनविण्याच्या ४९ शतकांपासून केवळ तीन शतके दूर आहे. या सोबतच त्याने या खेळीद्वारे १२७५४ धावा बनवत श्रीलंकेच्या महिला जयवर्धनेला मागे टाकले. महेला जयवर्धनेने वनडे सामन्यांमध्ये ४४८ सामन्यात एकूण १२६५० धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button