औरंगाबाद : पोलीस पेट्रोल पंपावरच दुचाकीने घेतला पेट | पुढारी

औरंगाबाद : पोलीस पेट्रोल पंपावरच दुचाकीने घेतला पेट

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील पोलीस पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी तरुणाने आणलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतला. पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच अग्निशमन यंत्रणा वापरून आग विझविली. बुधवारी (दि. ७) दुपारी १ वाजता ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण दुचाकी (क्र. एमएच २० बीएस ०२४८) घेऊन पोलीस पंपावर आला. त्याने पेट्रोल भरले. मात्र, दुचाकी सुरु होत नव्हती त्यामुळे थोडी पुढे घेतली आणि किक मारणे सुरु केले. तोच शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुचाकीने पेट घेतला. आग लागल्यामुळे तरुण दुचाकी सोडून बाजूला झाला. पंपावरच ही घटना घडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ तेथील अग्निरोधक यंत्रणा वापरून आग विझविली. व्यवस्थापक कदम, पोलीस कर्मचारी परदेशी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी हे काम केले. प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचलंत का?

Back to top button