औरंगाबाद : अजिंठा-अंधारी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ | पुढारी

औरंगाबाद : अजिंठा-अंधारी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ

अजिंठा : पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. रात्रभर सुरू असलेली रिपरिप रविवारी दुपारपर्यंत सुरूच रहिल्याने अंधारी मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीत सव्वा तीन फुटाने वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत ६० टक्के कमीच पाणीसाठा असल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यंदा सरासरी पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर धरणाच्या पाणीसाठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. जुलैमध्ये अधूनमधून रिमझिम पाऊस सुरुच होता. मात्र, शुक्रवारी दुपारी अर्धा तास पाऊस झाला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी तीन वाजता पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली होती.

अजिंठा अंधारी प्रकल्पातून ५ ते ६ गावांना पाणीपुरवठा

अजिंठा, शिवणा, अमसरी, मादणी, वाघेरा आदी गावांना पुरवठा केला जात आहे. अंधारी मध्यम प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा झाले आहे. या वर्षी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता गाववासीयांना भासली नसली, तरी अंधारी मध्यम प्रकल्पात पाणी पातळीत खुप कमी झाली होती. मात्र, प्रत्यक्षात धरणात शनिवारी रात्रीपासून पाण्याची आवक होऊ लागली आहे.

सोमवारी सकाळी अंधारी मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याची पातळी ५७०. ५० इतकी झाली असून गत वर्षीची ५६७. ४५ इतकी होती. तर तीन दिवसाच्या पावसाने सव्वा तीन फुटांनी पाणीसाठ्यात वाढ झाल्याची नोंद झाली आहे . मागील वर्षीच्या तुलनेत ३ ते ४ टक्क्यांनी पाणीसाठ्याची पातळी वाढली आहे.

अजिंठा मंडळात अतिवृष्टी

शनिवारी रात्री अजिंठा मंडळात ७१. मिमी पाऊस झाला आहे . सिल्लोड मंडळात १८ मिमी पाऊस झाला आहे. अजिंठा अंधारी प्रकल्पाच्या क्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे क्षेत्रातील नदी व नाल्यांद्वारे पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी वाढत आहे, असे सिल्लोड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता रोशन महाजन यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button